Thursday, March 13, 2025
Homeनगरमहाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्यांना 13 तारखेला बक्षीसाचे वितरण

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्यांना 13 तारखेला बक्षीसाचे वितरण

नगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नुकत्याच पारपडलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्या व पदक प्राप्त मल्लांना गुरूवार (दि. 13) रोजी नगरमध्ये होणार्‍या कार्यक्रमात बक्षीसांचे वितरण करण्यात येणार आहे. या बक्षीसांमध्ये दोन चारचाकी गाड्या, बुलेट व अन्य दुचाकी गाड्या व सोन्यांच्या अंगठ्यांचा यांचा समावेश आहे. हा परितोषिक वितरण समारंभ राज्य कुस्तीगीर संघाचे नूतन उपाध्यक्ष व स्पर्धेचे संयोजक आ. संग्राम जगताप व राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव, हिंद केसरी योगेश दोडके यांच्या हस्ते होणार आहे, अशी महिती राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी दिली.

- Advertisement -

नगर येथे नुकत्याच झालेल्या 67 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील गादी व माती विभागातील पदक विजेत्या कुस्तीगीरांना स्पर्धा आयोजक व राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आ. जगताप यांनीही बक्षीसे देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार फोर व्हीलर, बुलेट, टु व्हीलर गाड्या स्पर्धेच्या क्रीडानगरीत ठेवण्यात आल्या होत्या. आता या गाड्यांचा व सोन्याच्या अंगठ्यांचे परितोषिक वितरण समारंभ आ.जगताप यांच्या हस्ते होणार आहे.

यामध्ये महाराष्ट्र केसरी किताब विजेता, उपविजेता यांच्यासह माती विभागातील 30 व गादी विभागातील 40 कुस्तीगीरांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी व कागदपत्रे जमा करण्यासाठी जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव डॉ. संतोष भुजबळ व कार्यालयीन सचिव निलेश मदने यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कुस्तीगीर संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...