Thursday, March 13, 2025
Homeनगरमहाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सोलापूरच्या गायकवाडची विजयी सलामी

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सोलापूरच्या गायकवाडची विजयी सलामी

86 किलो व 57 किलोच्या लढतीत चौघांना सुवर्णपदक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील कै. बलभिम आण्णा जगताप क्रीडा नगरी वाडिया पार्क येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ अजिंक्यपद केसरी कुस्ती स्पर्धेत 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या फेरीला गुरूवारी प्रारंभ झाला. माती विभागात सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध पुणे शहरचे तानाजी झुंजुळकर यांच्या लढतीमध्ये महेंद्र गायकवाड याने विजयी सलामी दिली. महेंद्र गायकवाड यांनी तांत्रिक गुणांच्या आधारे कुस्ती जिंकली. तानाजी झुंजुळकर याला एकही गुण घेता आला नाही. त्यामुळे दहा गुणांनी महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आल्याची माहिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा कुस्ती स्पर्धा प्रमुख दिनेश गुंड यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, तत्पूर्वी 86 किलो वजन गटात माती विभागात चंद्रशेखर गवळी व हनुमंत पुरी यांच्या लढतीत चंद्रशेखर गवळी आणि 57 किलो वजन गटात सौरभ इगवे व दिग्विजय पाटील यांच्या लढतीत सौरभ इगवे यांनी विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. गादी विभागात 57 किलो वजन गटात कोल्हापूरच्या वैभव पाटील याने यवतमाळच्या तुषार जाधव याचा पराभव केला. तर, नाशिकच्या शुभम अचपळे याने सातार्‍याच्या गोरख कोळेकर याच्या मात करून फायनलमध्ये प्रवेश केला. 86 किलो वजन गटात धाराशिवच्या मुन्तजिर सरनोबतने सोलापूरच्या स्वप्निल काशिदवर विजय मिळवत अंतिम सामना गाठला. अहिल्यानगरच्या महेश फुलमाळी याने सोलापूरच्या गौतम शिंदेवर मात करून फायनल गाठली आहे.

अहिल्यानगर येथे महाराष्ट्र कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर कुस्ती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व अजिंक्य कुस्ती स्पर्धेचा गुरूवारी दुसरा दिवसाच्या खेळाला सकाळी 8 वाजता प्रारंभ झाला. 57 व 86 किलो वजन गटात माती विभाग व गादी विभागातील मल्लांच्या पात्रता, उपांत्य पूर्व, उपांत्य फेरीतील लढती झाल्या. दरम्यान, 86 किलो वजन गटामध्ये माती विभागामध्ये धुळेचा चंद्रशेखर गवळी याने गोल्ड, धाराशीवचा हनुमंत पुरी याने सिल्व्हर तर सोलापूरच्या सुनील जाधव यांनी ब्रांझ मेडल पटकावले.

तर, 57 किलो माती गटात सोलापूरचा सौरभ इगवेने गोल्ड, कोल्हापूरच्या दिग्विजय पाटील याने सिल्व्हर तर पुणे जिल्ह्यातील ओमकार निगडे याने ब्राँझ मेडल पटकावले. 86 किलो वजन गटामध्ये धाराशिवचा मुताम्बीर सरनोबत आणि अहिल्यानगरचा महेश फुलमाळी यांच्या लढत झाली. त्यात सरनोबत याने महेश फुलमाळीवर मात करत सुवर्णपदक पटकावले. याच गटात सोलापूरचे स्वप्नील काशिद आणि गौतम शिंदे यांना ब्राँझ मेडल विभागून देण्यात आले. 57 किलो वजनी गटामध्ये कोल्हापूरच्या वैभव पाटीलने सुवर्ण, नाशिकच्या शुभम आजपळेने सिल्व्हर पदक पटकावले तर सोलापूरचा अविराज माने आणि कोल्हापूरच्या रोहित पाटील यांना ब्राँझ पदक विभागून देण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...