Tuesday, July 23, 2024
Homeराजकीयविधानसभा निवडणुकीआधी राज्यात तिसरी आघाडी?

विधानसभा निवडणुकीआधी राज्यात तिसरी आघाडी?

मुंबई । Mumbai

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे महायुती (Mahayuti), महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) राजकारण रंगत असतानाच विधानसभेआधी नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील तीन बड्या नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. तशी बैठक मुंबईत (Mumbai) पार पडली आहे. आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu), शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आणि संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्यामध्ये तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झाली आहे. बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतचं भाष्य केलं आहे.

हे देखील वाचा : मिहिर शहा गुवाहाटीला पळाला की सुरतला?; वरळी अपघातावरुन राऊतांचा हल्लाबोल

सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. सध्या राज्यामध्ये राष्ट्रवादीचे (NCP) दोन गट, शिवसेनेचे (Shivsena) दोन गट; अशी परिस्थिती असून यातील एक-एक गट भाजपसोबत (BJP) सत्तेत आहे. तर दुसरे दोन गट काँग्रेससोबत (Congress) विरोधी पक्षातमध्ये आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने ताकदीने विधानसभा लढवण्याचा निर्धार केल्याचं दिसून येत आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : उबर कॅबमधून गांजा तस्करी

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे महायुतीला धडकी भरलेली आहे तर मविआकडे जिंकून येण्याचा निश्चय दिसून येत आहे. त्यातच जर विधानसभेच्या निवडणुकीआधी ही तिसरी आघाडी आघाडी झाली, तर यंदाची विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या