Friday, May 3, 2024
Homeनगरकृषी विधेयक स्थगिती : राज्य सरकारच्या आदेशाची अकोलेत भाजपकडून होळी

कृषी विधेयक स्थगिती : राज्य सरकारच्या आदेशाची अकोलेत भाजपकडून होळी

अकोले (प्रतिनिधी) –

केंद्राच्या नवीन कृषी विधेयकाला स्थगिती देणार्‍या राज्य सरकारच्या आदेशाची

- Advertisement -

होळी करून अकोले तालुका भाजपचे वतीने निषेध आंदोलन तहसील कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांचे नेतृत्वाखाली करण्यात आले.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी ऐतिहासीक कृषी विषयक विधेयक मंजुर करुन शेतकर्‍यांच्या जिवनात आमुलाग्र बदल घडविणारे पाऊल उचलले आहे. माञ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केन्द्राने मंजुर केलेल्या कृषी कायद्याच्या अमंलबजावणीस राज्यात स्थगिती दिली आहे. शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणार्‍या आघाडी सरकाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्थगिती आदेशाची होळी व निषेध आंदोलन करण्यात आले

उत्तर नगर जिल्हाचे उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, आदिवासी आघाडी चे जिल्हाध्यक्ष विजय भांगरे, यशवंतराव आभाळे, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, मछिंद्र मंडलिक, अल्पसंख्याक आघाडी चे तालुकाध्यक्ष सलीम पठाण, राज गवांदे, राहुल देशमुख, सुनील उगले, सुशांत वाकचौरे, ज्ञानेश पुंडे, अशोक आवारी, मदन आंबरे, शैलेश फटांगरे, राहुल चव्हाण, ओंकार कदम, हितेश कुंभार उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, दलाल, मापाडी यांच्या पिळवणुकीतून शेतकर्‍यांची सुटका करणारा व शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालविषयी स्वातंत्र्य देणारा नवीन कृषी कायदा केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रातील आघाडी सरकारने तो कायदा राज्यात लागू न करता त्यास स्थगिती आदेश दिला. राज्य सरकारने दिलेला स्थगिती आदेश तात्काळ मागे घ्यावा अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देऊन राज्य सरकारच्या स्थगिती आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यातील शेतकर्‍यांच्या फायद्याच्या तरतुदी स्पष्ट केल्या. तसेच राज्यातील सत्ताधारी पक्ष नवीन कृषी कायद्याबद्दल शेतकरी व समाजात खोटा प्रचार करून भ्रम निर्माण करत असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी केला आहे. राज्य सरकारच्या आदेशाची अकोलेत भाजपकडून होळी

- Advertisment -

ताज्या बातम्या