Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याशाखाप्रमुख ते मुख्यमंत्री...'असा' आहे एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास

शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री…’असा’ आहे एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास

मुंबई । Mumbai

शिवसेना नेते (Shiv Sena leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपद धोक्यात आले होते. त्यानंतर ठाकरे यांनी काल आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आज सकाळपासून राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? या चर्चांना उधाण आले होते. यानंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आज सायंकाळी एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत. एक साधा शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा प्रवास रहिला आहे…

- Advertisement -

या अगोदर एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Sambhaji Shinde) हे महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. तर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (२००४) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या