Sunday, November 29, 2026
Homeक्राईमKopargaon : वाहनांतून डिझेल चोरी करणार्‍या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांकडून पर्दाफाश

Kopargaon : वाहनांतून डिझेल चोरी करणार्‍या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांकडून पर्दाफाश

स्विफ्ट कारसह 3 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

कोपरगाव शहर व परिसरात वाहनांमधून डिझेल चोरी करणार्‍या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. येवला नाका परिसरात रात्रीच्या वेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या पथकाला एका संशयित कारबाबत शंका आल्याने त्यांनी कारची तपासणी केली. यावेळी डिझेल चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि डिझेल भरलेले ड्रम आढळून आले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत स्विफ्ट कारसह 35 लिटर डिझेल आणि अन्य साहित्य असा एकूण 3 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोपरगाव-अहिल्यानगर रस्त्यावरील बजाज शोरूमसमोरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या चौदा चाकी वाहनातून 28 नोव्हेंबर रोजी रात्री 9 ते 29 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजेदरम्यान डिझेल चोरी झाली. चोरट्यांनी वाहनाच्या डिझेल टाकीला प्लास्टिकचा पाइप जोडून अंदाजे 35 लिटर डिझेल चोरून नेले. दरम्यान, येवला नाका परिसरात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सुपेकर, सुशील शिंदे तसेच होमगार्ड गायकवाड आणि भाकरे यांचे पथक रात्री गस्त घालत होते. यावेळी एका कारचा संशय आल्याने पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. कारमध्ये डिझेल चोरीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे ड्रम, पाइप तसेच डिझेल भरलेले ड्रम आढळले.

पोलिसांनी कारमधील व्यक्तींची चौकशी करून किरण संतोष निकम (वय 39), गणेश रवी यनपुरे (वय 27) आणि सोनू अन्वर बिंद (वय 28, तिघे रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले. या कारवाईत अंदाजे तीन लाख रुपये किमतीची पांढर्‍या रंगाची स्विफ्ट डिझायर कार, 35 लिटर डिझेल असलेला एक ड्रम आणि 400 रुपये किमतीचे दोन प्लास्टिकचे ड्रम असा एकूण 3 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालक विनयकुमार राधेश्याम यादव यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. बी. राठोड करीत आहेत.

ताज्या बातम्या

‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai ‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या ऐतिहासिक व प्रतिष्ठित संघटनेच्या १३ व्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली....