Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र...

Maharashtra News : छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार – मुख्यमंत्री फडणवीस

पुणे | Pune

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रेचा शुभारंभ पुणे (Pune) येथे झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले.

- Advertisement -

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव केवळ भारतामध्ये नाही तर जगातील २० देशांमध्ये साजरा केला जातो. ज्यावेळी भारतातील अनेक मोठे राजे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारून त्यांच्यासोबत काम करत होते, अशा परिस्थितीमध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवरायांना मराठी मुलखाला व हिंदुस्थानला स्वतंत्र करायचे आहे, अशी शिकवण दिली. छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्र करत देव, देश, धर्म व रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली, त्यामुळे लाखोंची फौज घेऊन येणाऱ्या मुघलांनाही केवळ पाच हजार मावळे परास्त करायचे, असे त्यांनी सांगितले.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ किल्ले (Fort) लवकरच जागतिक वारसा केंद्र (World Heritage Centre) होणार आहेत. राज्यकर्ते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेली करांची रचना, शेतकरी हिताची कामे, जल, जंगल संवर्धन, अभेद्य तटबंदी, आरमार, समुद्रकिनाऱ्यांचे व्यवस्थापन, समुद्री सुरक्षा अशी प्रत्येक बाब महाराजांनी आपल्याला शिकविली. सामान्य माणूस, महिलांचे कल्याण, सन्मान यांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला. त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. एक मजबूत भारत, बलशाली भारत निर्माण करण्यासाठी ‘जय शिवाजी-जय भारत’ ही पदयात्रा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दरम्यान, यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Dr Mansukh Mandaviya) केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खा. मेधा कुलकर्णी, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार, मंत्री दत्तामामा भरणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...