मुंबई | वृत्तसंस्था | Mumbai
प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने (First Education Foundation) राज्यातील शाळा (School) सर्वेक्षणाचा (ग्रामीण) ‘असर’ अहवाल नुकताच प्रकाशित केला. त्यातील काही मुद्यांबाबत शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) स्पष्टीकरण देताना राज्यातील शालेय प्रगतीबाबत भाष्य केले आहे. १,०८,१४४ शाळांचा विचार करता संगणकाचा वापर करण्याचे प्रमाण ७२.९५ टक्के असल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने म्हटले आहे. ‘केवळ २०.४ टक्के विद्यार्थ्यांकडून संगणकाचा वापर होत आहे’ हा ‘असर’चा दावाही खोडून काढला आहे. संस्थेने ४८.३ टक्के शाळांमध्ये संगणक नसल्याचे नमूद केले आहे. मात्र, एकूण शाळांपैकी ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध आहे. मुलींसाठी ९६.८ टक्के शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उपलब्धता आहे, असेही शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.
‘प्रथम संस्थेने ४०९ प्राथमिक व ४६३ उच्च प्राथमिक व त्यावरील अशा ग्रामीण भागातील (Rural Area) ८७२ शाळांचे सर्वेक्षण केले आहे. युडायस डाटा सन २०२३-२४ अनुसार राज्यात एकूण १,०८,१४४ शाळा आहेत. ‘प्रथम’ने एकूण शाळांच्या केवळ ०.८१ टक्के शाळांचे सर्वेक्षण केले आहे. राज्यातील (State) एकूण २,०९,६१,८०० शालेय विद्यार्थ्यांपैकी केवळ ३३,७४६ मुलांचे सर्वेक्षण केले. हे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या केवळ ०.१६ टके असून त्याआधारे अहवाल प्रकाशित केला आहे, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. ‘प्रथम’ संस्थेच्या अहवालात बरेच सकारात्मक मुद्देही असल्याचे सांगून शालेय शिक्षण विभागाने त्याचे समर्थन केले आहे.
वय वर्ष ६ ते १४ मधील ६०.९ टक्के बालके शासकीय शाळांमध्ये शिक्षण (Education) घेत आहेत. ३८.५ टक्के बालके ही खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली व दुसरी मधील वाचन व गणितीय क्रिया यात विद्यार्थ्यांची संपादणूक व अध्ययन स्तर वाढल्याचे दिसून येते. इयत्ता तिसरी मधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये करोनात झालेला अध्ययन क्षय भरून काढण्यात येत आहे, असे दिसून येते. शासकीय शाळांमध्ये सन २०२२ च्या तुलनेत सन २०२४ मध्ये वाचनात १०.९ टक्के प्रगती दिसून येते. तर खासगी शाळांमध्ये वाचनात ८.१ टक्के प्रगती दिसून येते. गणितीय क्रियांत शासकीय शाळांमध्ये १३.१ टक्के प्रगती असून, खासगी शाळांमध्ये (Private Schools) ११.५ टक्के प्रगती दिसून येते, या सकारात्मक मुद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
पटनोंदणी दर जास्त
सन २०२४ मध्ये तीन वर्षांच्या पूर्व प्राथमिक शाळेमध्ये नोंदणी असणाऱ्या मुलांचे प्रमाण ९५ टक्के आहे. २०२२ मध्ये हे प्रमाण ९३.९ टक्के होते. महाराष्ट्रात ६ ते १४ वयोगटातील पटनोंदणी दर गेल्या ८ वर्षांपासून ९९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. महामारीच्या काळात शाळा बंद असूनही, २०१८ मधील ९९.२ टक्के वरून एकूण पटनोंदणीचे आकडे २०२२ मध्ये ९९.६ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. २०२४ मध्येसुध्दा ते स्थिर राहिले आहेत. म्हणजे या वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण ०.४ टक्के असून ते देशभरात १.९ टक्के आहे, अर असे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.