Monday, April 27, 2026
Homeमुख्य बातम्याVirar Building Collapsed : विरार इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली; आतापर्यंत 'इतक्या'...

Virar Building Collapsed : विरार इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली; आतापर्यंत ‘इतक्या’ जणांनी गमावला जीव

मुंबई | Mumbai

पालघर जिल्ह्यातील (Palghar District) विरार (पूर्व) भागात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चार मजली इमारत कोसळल्याची (Building Collapsed) घटना घडली होती. या दुर्घटनेत काल तिघांचा मृत्यू झाला होता. मात्र, आता सदर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, विरार इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण २४ जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून, अद्यापही बचावकार्य सुरु आहे. तसेच घटनास्थळी एनडीआरएफच्या ५ व्या बटालियनच्या दोन तुकड्या, वसई-विरार महानगरपालिकेची तुकडी आणि स्थानिक पोलिस रात्रंदिवस मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले आहेत.

दरम्यान, या इमारतीत ५० घरे असून, त्यापैकी १२ घरं कोसळली. तसेच इमारतीचा मलबा शेजारील चाळीवर कोसळल्याने (Collapsed) चाळ उद्ध्वस्त झाली आणि मोठी जीवितहानी झाली.

मृतांची नावे

आरोही जोविल (२४), उत्कर्षा जोविल (१), लक्ष्मण किसकू सिंग (२६), दिनेश सकपाळ (४३), सुप्रिया नेवाळकर (३८), पार्वती सकपाळ (६०) दीपेश सोनी ( ४१), सचिन नेवाळकर (४०), अर्णब नेवाळकर (११), हरीश सिंग बिष्ट (३४), सोनाली तेजाम (४१), कशिश पवन सहेनी (३५), शुभांगी पवन सहेनी (४०), गोविंद सिंग रावत (२८), दीपक सिंग बोहरा (२५) अशी मृतांची नावे आहेत.

ताज्या बातम्या

मराठी

Pratap Sarnaik: मराठी सक्तीवरुन मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधान; म्हणाले, “महाराष्ट्रात...

0
मुंबई | Mumbaiगेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर आता एक मोठी बातमी...