Wednesday, June 24, 2026
Homeमुख्य बातम्याMaharashtra News : महायुतीचा महामंडळ वाटपाचा तिढा सुटला; कुणाच्या वाट्याला किती महामंडळं?

Maharashtra News : महायुतीचा महामंडळ वाटपाचा तिढा सुटला; कुणाच्या वाट्याला किती महामंडळं?

मुंबई | Mumbai

गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या महायुतीचा (Mahayuti) महामंडळ वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. संख्याबळानुसार महायुतीत महामंडळांचे वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात भाजपच्या वाट्याला ४४ शिंदेंच्या शिवसेनेला ३३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या (NCP) वाट्याला २३ महामंडळं आले आहेत. मात्र, सिडको आणि म्हाडा या दोन महत्त्वाच्या महामंडळांवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

महामंडळ वाटपासाठी नुकतीच महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत या महामंडळाबाबत (Corporation) तीनही पक्षात हे सूत्र ठरल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, महायुतीच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाकडे कुठले महामंडळ जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, महामंडळांवरील नियुक्त्या हा सत्तावाटपाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि आमदारांना योग्य स्थान मिळते. यामुळे आता पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.
दुसरीकडे महायुतीमधील तीनही पक्षांच्या नाराज आमदारांनी (MLA) आता महामंडळ अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. या वाटपामुळे पक्षांतर्गत असंतोष कमी होऊन आगामी निवडणुकांमध्ये (Election) महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसाला नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार – वनमंत्री...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यात वन्याप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसाला कायमस्वरुपी नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल,...