Sunday, July 26, 2026
HomeनगरDeolali Pravara : विजेच्या तारा तुटून गोठ्यावर पडून आठ गायींचा तडफडून मृत्यू

Deolali Pravara : विजेच्या तारा तुटून गोठ्यावर पडून आठ गायींचा तडफडून मृत्यू

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

देवळाली प्रवरा परिसरातील लाख रस्ता भागात शेतकरी मच्छिंद्र बापू काळे यांच्या गोठ्यावर (Cowshed) विजेच्या तारा तुटून पडल्याने (Power Lines Snapped) विद्युत प्रवाह पसरला आणि त्यात आठ गायींचा तडफडून मृत्यू (Cow Death) झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार (दि. 23 जून) रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी परिसरात रिमझिम पावसासह (Rain) जोरदार वादळी वार्‍यांना (Stormy Winds) सुरुवात झाली. अचानक आलेल्या वादळामुळे घरासमोरील वीजवाहक तारा तुटून खाली पडल्या. या तारा काळे यांच्या जनावरांच्या गोठ्यावर पडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह पसरला. त्याचवेळी रिमझिम पाऊस सुरू असल्याने गोठ्यातील आठ गायींना विजेचा तीव्र धक्का बसला. या घटनेत सर्व आठ गायींचा जागीच तडफडून मृत्यू (Cow Death) झाला. या दुर्घटनेमुळे काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचे सुमारा 10 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष सत्यजीत कदम, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे, माजी नगरसेवक डॉ. संदीप मुसमाडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच नगराध्यक्ष कदम यांनी महसूल विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, शासनाकडून काळे कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर वीजवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वीज वितरण यंत्रणेने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Fraud Crime : ईव्ही डीलरशिपच्या नावे लूट; बनावट वेबसाईट तयार...

0
नाशिक । प्रतिनिधी | Nashik शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) व्यावसायिक विस्ताराचा गैरफायदा घेत सायबर चाेरट्यांनी (Cyber Thieves) एक हायटेक जाळे पसरवल्याचे समोर आले आहे. नामांकित...