Friday, September 11, 2026
HomeनगरAhilyanagar : यंदा 11 दिवस दिवाळीच्या सुट्या

Ahilyanagar : यंदा 11 दिवस दिवाळीच्या सुट्या

शैक्षणिक वर्षात 237 दिवस अध्यापनाचे अन् 128 दिवस सुट्ट्यांचे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

यंदाच्या शैक्षणिक वर्षात (2026-27) मध्ये जिल्ह्यातील शाळांना दिवाळीच्या 11 दिवस सुट्ट्या असणार आहेत. यात 4 ते 14 नोव्हेंबर या काळात या सुट्ट्या असणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे वेळापत्रक शिक्षण विभागाने तयार करून त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता घेण्यात आली आहे. सुट्ट्यांच्या आणि शैक्षणिक कामकाजाच्या वेळापत्रकानूसार यंदा नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि खासगी प्राथमिक शाळाच्या शैक्षणिक वर्षात 237 दिवस अध्यापनाचे असणार आहेत.

- Advertisement -

शिक्षण विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत नागपंचमीपर्यंत विविध सुट्ट्यानूसार येत्या 26 ऑगस्टला ईद-ए-मिलादची आणि 28 ऑगस्टला रक्षाबंधनाची सुट्टी असणार आहे. या महिन्यात पाच रविवारीदेखील शाळांना सुट्टी असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) नियमानुसार, शैक्षणिक वर्षात परीक्षेचे दिवस वगळून किमान 220 दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे, अशी अपेक्षा आहे.शैक्षणिक वर्षात 76 दिवस सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. यात 33 दिवस सार्वजनिक स्थानिक व प्रासंगिक व दिर्घकालीन सुट्ट्यांचा समावेश राहणार आहे. याशिवाय वर्षातील 52 रविवारीदेखील शाळांना सुट्टी राहील. शैक्षणिक वर्षात कामाचे एकूण 237 दिवस असतील. त्यात परीक्षेचे दिवसदेखील असणार आहेत.

सर्वाचे लक्ष असणार्‍या दिवाळीच्या सुट्ट्या यंदा 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यात धनत्रयोदशी, दिपावली दिर्घ सुट्ट्या, लक्ष्मीपूजन, बालप्रतिपदा, भाऊबील अशा 4 नाव्हेंबर ते 14 नाव्हेंबर अशा 11 दिवस दिवाळीची सुट्टी राहणार आहे. सर्वात कमी सुट्या या जानेवारी आणि फेबु्रवारी 2027 मध्ये राहणार आहेत. त्यानंतर 2 मे ते 31 मे या कालावधीत उन्हाळी सुट्ट्या राहणार आहेत.

शाळांच्या सुट्या अशा
ऑगस्ट : ईद-ए-मिलाद : 26 ऑगस्ट, रक्षाबंधन : 28 ऑगस्ट).
सप्टेंबर : (5 सप्टेंबर गोपाळकालाा, 10 सप्टेंबर पोळा, 14 सप्टेंबर : गणेश चतुर्थी, 18 सप्टेंबर : गौरी पूजन, 25 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी).
ऑक्टोबर : (2 ऑक्टोबर : महात्मा गांधी जयंती, 20 ऑक्टोबर : दसरा).
नोव्हेंबर : (4 ते 14 नोव्हेंबर : दिवाळी सुट्टी, 24 नोव्हेंबर : गुरुनानक जयंती).
डिसेंबर : (23 डिसेंबर दत्त जयंती, 25 डिसेंबर : नाताळ).
जानेवारी : (15 जानेवारी : मकरसंक्रांत, 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन).
फेब्रुवारी : (19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती).
मार्च : (6 मार्च : महाशिवरात्री, 10 मार्च : रमजान ईद, 22 मार्च : धुलिवंदन, 26 मार्च : गुड फ्रायडे, 27 मार्च : रंगपंचमी).
एप्रिल : (7 एप्रिल : गुढीपाडवा, 14 एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 15 एप्रिल : श्री राम नवमी, 18 एप्रिल : महावीर जयंती). मे : (1 मे : महाराष्ट्र दिन), 2 मे ते 16 मे उन्हाळी सुट्टी, 17 जून बकरी ईद, 18 ते 31 मे उन्हाळी सुट्टी राहणार आहे.

अंतिम सत्र परीक्षा एप्रिलअखेर
यंदा मतदार पुनरीक्षण, जनगणना आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामामुळे बहुतेक शिक्षकांना अध्यापनासाठी कमी दिवस मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर 2026-27 या शैक्षणिक वर्षातील शालेय विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा 20 एप्रिलनंतरच घेतली जाणार आहे. 1 मे रोजी परीक्षांचा निकाल जाहीर होऊन 14 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असणार आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : ना. विखे यांच्यावरील एकेरी टीका खपवून घेणार नाही, जरांगेंना...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वर्षभर सातत्याने प्रयत्न करून अनेक...