Thursday, June 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ

Maharashtra News : बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदान (Voting) केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसेच बीएलओ पर्यवेक्षकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, मतदार नोंदणी अधिकारी (इआरओ) आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ) यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार बीएलओचे (BLO) २०१५ पासूनचे मानधन सहा हजार वरून १२ हजार तर मतदार यादी पुनरावलोकनासाठी बीएलओ प्रोत्साहन रक्कम १ हजार वरून २ हजार रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बीएलओ पर्यवेक्षक यांचे मानधन १२ हजार वरून १८ हजार रुपये  करण्यात आले आहे. एईआरओ यांना प्रथमच २५ हजार रुपये तर ईआरओ यांनाही प्रथमच ३० हजार रुपये मानधन देण्यात येईल.

याशिवाय, बिहारपासून (Bihar) सुरू झालेल्या या विशेष तीव्र पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेसाठी बीएलओंना सहा हजार रुपये इतके विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येणार आहे. हा निर्णय निवडणूक प्रक्रियेची अचूकता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य मानधन देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...