Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकLocal Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच; आता ६ ऑक्टोबरला...

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच; आता ६ ऑक्टोबरला अंतिम प्रभागरचना

राज्य निवडणूक आयोग अंतिम मान्यता देणार, प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक

मुंबई | Mumbai

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या (NMC Election) प्रभागरचना ऑक्टोबर महिन्यात (October Month) अंतिम होणार आहे. प्रभागरचना प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार महापालिका, नगरपालिका निवडणुका महिन्यानंतरच ऑक्टोबर म्हणजेच दिवाळीनंतरच (Diwali) निवडणुकांचे फटाके फुटणार आहेत. महापालिका, नगरपालिकांच्या प्रभागरचना अंतिम करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिका (Mumbai NMC) प्रभागरचना ६ ऑक्टोबरनंतर तर ड वर्ग महापालिका प्रभागरचना १३ ऑक्टोबरला अंतिम होणार आहे. विविध कारणांनी मागील सुमारे तीन वर्षापासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार मुहूर्त लागले होते. शासनाने याबाबत चार सदस्यीय प्रभागरचना करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार सप्टेंबरमध्ये प्रभागरचना जाहीर होणार होती, मात्र आज पुन्हा त्यात बदल केल्यामुळे आणखी एक महिना ही प्रक्रिया लांबली आहे.

YouTube video player

राज्य शासनाने महापालिका निवडणूक संदर्भात १२ जून रोजी आदेश काढत प्रभागरचनेवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १२ जूनपासून कामकाज सुरु करुन ४ सप्टेंबर रोजी अंतिम प्रभागरचना तयार केली जाणार होती. मात्र शासनाने महापालिकेला नव्याने निर्देश काढत सुधारित कालबद्ध कार्यक्रम ठरवून दिला आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेची अंतिम प्रभाग आता रचना ६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यासह यामुळे महापालिकेची निवडणूक (Election) महिनाभर लांबली आहे.

शासनाने (Government) महापालिकेला नव्या कालबद्ध कार्यक्रमातर्गत टप्पेनिहाय प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. नऊ टप्यात महापालिका प्रशासनाला प्रभाग रचनेचे काम केले जाणार आहे. त्यानुसार गत तेरा दिवसांमध्ये मुख्य समितीकडून ११ ते १६ जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी करण्यात आली. १७ ते १८ जून दरम्यान जनगणनेची माहिती तपासणी असून १९ ते ४ जुलैपर्यत स्थळ पाहणी होईल. तर ५ ते १० जुलै दरम्यान गुगलवर नकाशे (Map) तयार केले जातील. निवडणूक आयुक्तांकडून अंतिम केलेली प्रभाग रचना ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अधिसुचनेद्वारे प्रसिद्ध होणार आहे.

त्यानुसार प्रभागरचनेचे (Ward Structure) काम ११ जून ते ६ ऑक्टोबर कालावधीत होणे अपेक्षित असून तसे निर्देशच महापालिकेला दिले आहेत. प्रभाग रचनेसंदर्भात शासनाने कालबध्द कार्यक्रमातर्गते घालून दिलेल्या कालावधीत टप्पेनिहाय कामाची कार्यवाही पूर्ण करावे लागणार आहे. प्रभाग रचनेसंदर्भातील कामाची जबाबदारी मनपा आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांच्याकडे असणार आहे. मुख्य समितीच्या त्या प्रमुख असून यासह उपसमित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला (Election Commission) सादर केला जाणार आहे.

असे आहेत टप्पे

१) ११ ते १६ जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी, प्रारुप प्रभागरचना तयार करणे.

२) १७ जून ते ३१ जुलै दरम्यान जनगणनेची माहिती तपासणे, स्थळ पाहणी, गुगल मॅप वर प्रभागाचे नकाशे तयार करणे, प्रारूप प्रभागरचनेचा मसुदा तयार करून त्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे.

३) १ ऑगस्ट ते ५ ऑगस्टदरम्यान प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागास सादर करणे.

४) ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव नगर विकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे. राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभागरचनेस मान्यता देणे.

असे आहेत टप्पे

१) २२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती मागवणे.

२) २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान प्राप्त हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेणे.

३) ९ ते १५ सप्टेंबर दरम्यान सुनावणीनंतर हरकती आणि सूचनांवर शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रभागरचना अंतिम करून नगर विकास विभागाला पाठवणे.

४) १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान अंतिम केलेली प्रभागरचना नगर विकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे. राज्य निवडणूक आयोग यांनी अंतिम प्रभागरचनेला मान्यता देणे.

५) ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम प्रभागरचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे. ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर

ताज्या बातम्या

Nashik BJP Politics : भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा

0
नाशिक | प्रतिनिधी भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी आपल्याकडे असलेल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली...