Saturday, May 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : "चांदीची ताटं, जेवणासाठी चार हजार अन्..."; अंदाज समितीच्या सदस्यांचा राज्याच्या...

Maharashtra News : “चांदीची ताटं, जेवणासाठी चार हजार अन्…”; अंदाज समितीच्या सदस्यांचा राज्याच्या तिजोरीतून राजेशाही थाट

मुंबई | Mumbai

संसद आणि राज्य विधिमंडळातील अंदाज समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत (Mumbai) काल (मंगळवारी) समारोप झाला. या समारोपाच्या निमित्ताने सदस्य आणि अध्यक्षांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासाठी चांदीच्या ताटातून पंचपक्वान्नाची सोय करण्यात आली होती. त्यानंतर आता कार्यक्रमावर ही जनतेच्या पैशांची (Money) बेधुंद उधळपट्टी असल्याचे म्हणत टीका केली जात आहे.

- Advertisement -

या परिषदेत देशभरातील ६०० अतिथी, अध्यक्ष, सदस्य आणि अधिकारी सहभागी झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी विधानभवनाबाहेर (Vidhan bhavan) ४० फूट उंचीचे भव्य फलक उभारण्यात आले होते. तसेच अध्यक्ष आणि सदस्यांसाठी हॉटेल ताज (Hotel Taj) पॅलेसमध्ये, तर अधिकाऱ्यांसाठी हॉटेल ट्रायडंटमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. त्याचबरोबर विधीमंडळ प्रांगणात मलमली कापडाचे वातानुकूलित भोजन मंडप उभारण्यात आले होते.

जेवणासाठी चांदीच्या ताटांसह (Silver Platter) चमचे, वाट्या, ग्लास हे देखील चांदीचे होते. या चांदीच्या ताटाचे एका दिवसाचे भाडे ५५० रुपये होते. तसेच एका ताटामागे जेवणासाठी ४००० रुपये अशाप्रकारे एका व्यक्तीमागे एकूण ४५०० रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या चांदीच्या ताटात जेवण्यासाठी खास मेन्यूही ठेवण्यात आला होता. ज्यामध्ये कोथिंबीर वडी, मालवणी करी, सुरमई फ्राय, दहीवडे, बटाट्याची भाजी, पुरण पोळी यांचा समावेश होता.

दरम्यान, अंदाज समितीने सरकारला (Government) काटकसर करण्यासाठी शिफारस करण्याची अपेक्षा असताना त्यांच्याच अधिवेशनात उधळपट्टी झाल्याने राज्य विधिमंडळाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच भोजनासह राहण्याची ही शाही व्यवस्था पाहता, सामान्य माणसाच्या कररुपी पैशाची अशी लूटमार करणाऱ्या या मंडळींना काटकसरीची भाषा समजत नाही का? असा प्रश्न नागरिकांकडून (Citizen) विचारला जात आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ९ मे २०२६ – राजभवनाचा राजकीय अडथळा

0
तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालानंतर दक्षिण भारताच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. सुपरस्टार विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने १०८ जागा जिंकून तामिळनाडूच्या...