जळगाव | Jalgaon
जामनेर तालुक्यातील (Jamner Taluka) पहुर येथील मुळ रहिवासी व सध्या जामनेर शहरात वास्तव्यास असलेल्या प्रफुल्ल लोढा याला आधीच पोस्को अंतर्गत अटक (Arrested) झालेली असतास त्याच्यावर हनीट्रॅपचा देखील आरोप आहे. त्याच गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी लोहाच्या जामनेर येथील निवासस्थानी देखील धाड टाक्त चौकी केली. लोढा सध्या भाजपात असल्याने भाजपा नेते देखील टार्गेटवर आले आहे. याच दरम्यान सोमवारी दिवसभर लोहाचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत असलेले फोटो सत्ताधारी व विरोधकांनी सोशल मिडियावर आरोपांची राळ उठवली. त्यामुळे हनीट्रॅप प्रकरणावरून जळगाव जिल्ह्यात चांगलेच राजकारण तापले आहे.
प्रफुल्ल लोढाकडील (Prafulla Lodha) पेन ड्राईव्ह, सीडी शोधण्यासाठी पोलीस जंगजंग पछाडत आहेत. लोढा हा भाजपचा हस्तक असून त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरही हनीट्रॅप लावले. पण हे स्वतःवर उलटल्याने धावाधाव सुरू झाली. त्यामुळे भाजपची जी वॉशिंग मशीन आहे, त्यामध्ये काही डाग धूतले जात नाहीत. त्यातील हा एक डाग आहे, असा सणसणीत टोला राऊत यानी लगावला.
लोढाची एसआयटी चौकशी करा
प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीने हनीट्रॅपची सगळी माहिती आहे, या प्रकरणाची एसआयटीमार्फत (SIT) चौकशी करावी महाराष्ट्रात अलिकडच्या कालखंडात बऱ्याच ठिकाणी असे हनीट्रॅपची प्रकरणे आहेत. नुकतेच नाशिकचे एक प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात ७२ अधिकारी आणि काही लोक अडकल्याचे सांगितले जाते आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या चालू आहे. त्यामुळे या प्रफुल्ल लोढाची चौकशी करावी अशी मागणी आ. एकनाथ खडसे यांनी केली आहे. प्रफुल्ल लोढ़ा ही व्यक्ती भाजपच्या गिरीश महाजन यांचा कार्यकर्ता आहे. या माणसाविरोधात दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अंधेरी, साकिनाका इथे हे वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. एक गुन्हा हा दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे, या मुलींना छळणे, ब्लाकमेलिंग करणे असा या प्रकरणात आरोप आहे. तर दुसरा पुन्हा हा हनीट्रॅपसंदर्भात आहेत, या गुन्ह्यात अल्पवयीन मुलींना आमिष दाखवणे, त्यांचे अश्लील फोटो काढणे असे गुन्हे दाखल झालेले आहेत, अशी माहिती खडसे यांनी दिली. हा प्रफुल्ल लोढा हनीट्रॅप प्रकरणात आहे, बलात्कार प्रकरणातही आहे. हा एक सामान्य कार्यकर्ता होता. अगोदर तो काँग्रेसमध्ये होता. नंतर तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. नंतर त्याने भाजपात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या पक्षप्रवेशाला मुख्यमंत्री कार्यालयाचे रामेश्वर नाईकसुद्धा उपस्थित होते. प्रफुल्ल लोढ़ा, गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांचे खूप चांगले संबंध होते. पण गेल्या वर्षी याच प्रफुल्ल लोढा याने रामेश्वर नाईक आणि गिरीश महाजनविरोधात एक तक्रार दाखल केली होती.
मग दादा, ठाकरेंची चौकशी करायची का?
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा प्रफुल्ल लोढा यांच्या सोबत फोटो ट्रिट केला होता. यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की, प्रफुल्ल लोढा अनेक पक्षात होता. शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रफुल्ल लोढाचे फोटो आहेत. यांचा पण हनीट्रॅपशी संबंध आहे का? या सर्वांची पण आता सीबीआय आणि एसआयटी चौकशी करायची का? असा खडा सवाल गिरीश महाजन यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. तर एकनाथ खडसेंनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली होती. यावर बोलताना महाजन म्हणाले की, खड़से हे प्रफुल्ल लोढा यांच्या एसआयटी चौकशीची मागणी करत आहेत, पण काही वर्षापूर्वी लोढा याने खड़से यांच्या मुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणाच्या एसआयटी चौकशी मागणी केली होती. एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू कसा झाला? त्या प्रकरणाची आता चौकशी करायची का? असे महाजन यांनी म्हटले आहे.
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय
पुढे बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, मी एवढ्या खालच्या पातळीवर जाणार नाही, पण एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कोणत्याही प्रकरणात मीच त्यांना दिसतो. कोणात्याही प्रकरणात खडसे माझा संबंध जोडून झाली बदनामी करतात. सध्या प्रफुल्ल लोढाला पोलिसांनी अटक केली आहे, पोलिस त्याची चौकशी करतील आणि जे सत्य समोर यायचे ते येईलच.
एकनाथ खडसे जाणूनबुजून महाजनांना टार्गेट करतायत
मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) केलेल्या वक्त्यावरून राजकारण तापले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महाजन यांच्या समर्थनार्थ समोर आले. खडसेंकडून महाजन यांना जाणुनबुजून टार्गेट करण्यात येत आहे.या माध्यमातून ते महाजन यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप बावनकुळे यांनी लागावला. नागपुरात ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. एखाद्या व्यक्तीशी फक्त संबंध असल्याचा अर्थ गुन्हा केले असा होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले, असा होत नाही. खडसे सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोम करता, हे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी देखील सायंकाळी बोलतांना विरोधकांवर तोंडसुख घेतले. दिवसभर केवळ बोलत रहायचे मात्र पुरावे द्यायचे नाहीत तुमच्याकडे असतील तर पुरावे द्या. असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात. महाराष्ट्रात हनीट्रॅप नाही, असे त्यांनी सांगितले. या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या. त्यानंतर दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असे थेट आव्हान राऊत यांनी दिले आहे. तसेच ४ मंत्री, अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले तरुण खासदार तेव्हा याच ट्रॅपमुळे पळाले, असा खळबळजनक आरोप करीत हनीट्रपचे धागेदोरे जामनेरपर्यंत असल्याचा दावा खा. संजय राऊत यांनी केला आहे.
हनी ट्रॅपचे धागेदोरे जामनेरपर्यंत!
जामनेर येथील प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात मुंबईत पोस्को बलात्कारसह हनी ट्रॅप प्रकरणात दोन गुन्हे दाखल असून प्रफुल लोढा यास अटक देखील करण्यात आली आहे. प्रफुद्ध लोढा यास अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून जळगाव जामनेर व पहर या ठिकाणी प्रफुल लोढा वाच्या मालमत्तेची पोलिसांकडून झडती घेण्यात आली आहे. पोलिसांनी लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त केली आहेत.
हनीट्रॅपमध्ये चार मंत्री अडकले
हनीट्रॅपबद्दल देवेंद्र फडणवीस यांना माहित असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फड़णवीस खोट बोलत आहेत. चार मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकले आहेत असे राऊत म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी थोड़ी माहिती दिली आहे. यासंदर्भात पूर्ण माहिती देणार आहे. ही लोक वेश पालटून जात होते. ज्यांना सीडी दखवत होते असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. तर संजय राऊत पुढे म्हणाले की, प्रफुल्ल लोढा हनीट्रॅपमधून अनेक महत्त्वाच्या लोकांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने पकडत होते. स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचा सत्कार स्वीकारताना फोटो आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी प्रफुल्ल लोढा आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटोच माध्यमांना दाखवला. हा भारतीय जनता पक्षाचा खास हस्तक आहे आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवर देखील ट्रॅप लावले गेलेत. पण, आता ते स्वतःवरच उलटल्याने त्यांची धावाधाव सुरू आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वाशिंग मशीनमध्ये काही डाग धुतले जात नाही, त्यातला हा एक डाग आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीचे सरकार पाडताना जे वेश पालटून जात होते, ते याच कारणातून एकमेकांना भेटत होते. हुडी घालून मरीन लाईनच्या पुलाखाली काळोखात भेटत होते. या सीडी प्रकरणामुळेच काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी पटापट उड्या मारून सूरतचा रस्ता पकडला, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला.





