Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदेशाच्या खेडोपाड्यात TV पोहोचवणारा काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे...

देशाच्या खेडोपाड्यात TV पोहोचवणारा काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ वसंत चिटणीस (वय १००) (Eknath Chitnis) यांचे आज (बुधवारी) सकाळी पुण्यात निधन (Passed Away) झाले. इस्रोच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी १९७० च्या दशकापासून केलेल्या प्रयत्नांमुळे १९९० च्या दशकात देशात खेडोपाडी टीव्ही पोहचले. त्यामुळे देशाच्या खेडोपाड्यात टीव्ही पोहोचवणारा किमयागार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

- Advertisement -

डॉ. एकनाथ चिटणीस यांचा जन्म १९२५ मध्ये कोल्हापूरात झाला. लहान वयातच वडिलांचे निधन झाल्यामुळे आजी आणि कुटुंबियांच्या संस्कारांनी आणि आजोबा मल्हार खंडेराव चिटणीस यांच्या “वंडर्स ऑफ स्पेस” या मराठी ग्रंथाने त्यांच्या अंतरिक्षप्रेमाला दिशा दिली. त्यांनी पुणे विद्यापीठातून (Pune University) भौतिकशास्त्रात प्रथम श्रेणीत पदवी संपादन केल्यानंतर रेडिओ संपर्कशास्त्र विषयात पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.

YouTube video player

ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सूचनेनुसार अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स त्रिज्ञान संस्था (एमआयटी) सोडून अवकाश संशोधन व क्ष-किरण संशोधन करण्यासाठी ते भारतात परतले. १९६० ते १९७० च्या दशकात त्यांनी क्ष-किरण आणि अवकाश संशोधन विषयांवर संशोधन केले. भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमात त्यांनी विक्रम साराभाईंसह १९६१पासून काम केले. अवकाश उपयोजन केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी निभावली. उपग्रह प्रक्षेपणासाठी थुम्बा हे स्थळ त्यांनी शोधले होते. १९६२ मध्ये ते इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चचे (इन्कोस्पार) सदस्य सचिव झाले. या संस्थेचेच पुढे भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) रूपांतर झाले.

दरम्यान, वसंत चिटणीस यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे १९७० च्या दशकात शेती, हवामान, आस्त्रय, शिक्षण, दूरसंपर्क, मनोरंजन अशा क्षेत्रांत अवकाश संशोधन तंत्रज्ञानाचा (Technology) उपयोग करण्यासाठी ‘नासा’च्या सहकायनि सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट (SITE) प्रकल्प अंमलबजावणी करण्यात प्रा. यशपाल यांच्यासह त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. यामुळे नासाच्या उपग्रहाच्या साहाय्याने सहा राज्यांतील २,४०० गावांपर्यंत शिक्षण पोहोचले. तर याच प्रयोगातून पुढे INSAT प्रणालीचा पाया रचला गेला आणि भारताच्या डिजिटल युगाची बीजे रोवली. विज्ञान क्षेत्रातील डॉ. चिटणीस यांच्या योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले होते.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....