Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचाऱ्यांचे ठाण; विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या बदल्याच होत नसल्याने आश्चर्य

Maharashtra News : सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचाऱ्यांचे ठाण; विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या बदल्याच होत नसल्याने आश्चर्य

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदली (Transfer of Maharashtra Government Employees) अधिनियमला वाकवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळातील लिपीक, वरिष्ठ लिपीक,रोखपाल या पदावरील तृतीय श्रेणीचे कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच जागेवर आद्यपही ठाण मांडून आहेत. जून महिन्यात मुंबई मंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. मात्र, मंडळातील काही विशिष्ट कर्मचाऱ्यांचा बदल्याच झाल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisement -

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) मुंबई मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांनी गेल्या महिन्यात   लिपिक, वरिष्ठ लिपीक, रोखपाल या पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. मात्र, या बदल्या करताना गेल्या अनेक वर्षापासून एकाच जागेवर चिकटून बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना हात लावलेला नाही. जुलै महिना निम्मा संपल्याने यावर्षी या कर्मचाऱ्यांच्या बदलीची शक्यता मावळली आहे.

बांधकाम खात्याच्या मुंबईतील प्रादेशिक, मंडळ आणि विभागीय कार्यालयात अनेक कर्मचारी निविदा लिपीक, रोखपाल या पदांवर वर्षानुवर्ष कार्यरत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांच्या शाखा बदलल्या जात नाहीत. विभागाच्या १५ जानेवारी २०१९ च्या शासन परिपत्रकानुसार लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीन वर्ष प्रशासन शाखा आणि तीन वर्षे लेखा शाखा अशा पद्धतीने करण्याचे अपेक्षित आहे. मात्र, या परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई मंडळाच्या कोकण १ आणि कोकण २ विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार होत असताना मर्जीतील काही ठराविक कर्मचाऱ्यांना (Employees) बदलीपासून अभय दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

मुंबई मंडळात ठाण मांडलेले कर्मचारी

  • आनंद कदम : गेल्या ११ वर्षापासून मुंबई इलाखा शहर विभागात संगणक पदावर कार्यरत, कंत्राटदारांची देयके देण्याची जबाबदारी
  • दिपेश इंदुलकर : वरिष्ठ लिपिक म्हणून अधीक्षक अभियंता कार्यालयात गेल्या नऊ वर्षांपासून कार्यरत असून यांच्याकडे अर्थ शाखेचा कार्यभार
  • मनोहर कांबळे : मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागात गेली १६ वर्ष कार्यरत. वरिष्ठ लिपीक ते अधीक्षक अशी बढती मिळूनही इतरत्र बदली नाही.
  • योगेश डांगे : कनिष्ठ लिपिक म्हणून गेल्या ११ वर्षांपासून मुख्य अभियंता कार्यालयात कार्यरत.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...