Friday, April 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray  : "हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न"; मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव...

Uddhav Thackeray  : “हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न”; मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई | Mumbai

दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काळी उघडकीस आली होती. यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी घटनास्थळी भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून, हा प्रकार करुन महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असू शकतो, असे म्हटले.

- Advertisement -

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत.मात्र, आम्ही त्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. हे कृत्य करणाऱ्या दोन प्रवृत्ती असू शकतात. एक तर ज्याला स्वत:च्या आई वडिलांचे नाव घ्यायला लाज शरम वाटते अशाच बेवारस लाव्हारीस माणसाने केले असेल आणि दुसरे बिहारमध्ये ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा अवमान झाला म्हणत काही जणांनी बिहारमध्ये बंद करण्याचा असफल प्रयत्न केला. असाच कुणाचा तरी महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न असेल”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “पोलिसांशी आम्ही चर्चा केली असून, त्यांनी सीसीटीव्ही शोधून आम्ही आरोपीला तत्काळ पकडू, असे सांगितले आहे. समाज कंटकांना अशी कृती करून महाराष्ट्र पेटवायचा असेल, अशी भीतीही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे ते लवकरात लवकर आरोपीला शोधतील”, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

२४ तासांत आरोपीला शोधा – राज ठाकरे

सदर घटना घडल्यानंतर आज दुपारी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यास्थळी जाऊन माहिती घेतली. यावेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांकडून राज ठाकरेंना संबंधित घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी राज यांनी सगळे सीसीटीव्ही चेक करा, २४ तासांमध्ये आरोपींना शोधून काढा, अशा सूचना पोलिसांना दिल्या.

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...