मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडत आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित आहेत. मात्र, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि रोजगार व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा आहे.
मंत्री भरत गोगावले (Minister Bharat Gogawale) यांना स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. तर एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी का मारली? हे देखील गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल १४ हजार पोलीसपदांच्या भरतीसंदर्भात (Police Bharati) निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिला मिळणार आहे.
दरम्यान, या भरतीद्वारे पोलीस दलात नव्या आणि ताज्या दमाच्या तरुणांचा समावेश होणार आहे.याबाबत लवकरच राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या पोलीस भरतीमुळे राज्यातील (State) अनेक युवकांना त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मोठा संधी मिळणार असून, पोलीस दलाला नवीन ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय होतो का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.





