Wednesday, January 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar Political Journey : सहकारातून कारकि‍र्दीला सुरुवात ते खासदार, आमदार आणि...

Ajit Pawar Political Journey : सहकारातून कारकि‍र्दीला सुरुवात ते खासदार, आमदार आणि उपमुख्यमंत्रीपदाचा विक्रम; अशी होती अजित पवारांची राजकीय वाटचाल

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांचे आज (बुधवारी) सकाळी बारामती विमानतळावर
भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून, सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत. सात वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांचा राजकीय प्रवास हा अनेक चढ-उतारांनी भरलेला होता.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

YouTube video player

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीय बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. यानंतर अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde and Fadanvis) पाठिंबा देत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २०२४ मध्ये अजित पवारांनी विधानसभा निवडणूकही भाजपसोबत लढवली आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारमध्ये ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले.

हे देखील वाचा : Ajit Pawar Death : दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अजित पवारांची राजकीय वाटचाल

अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. राजकारणातील ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि प्रशासकीय पकडीसाठी ओळखले जात होते. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे सुपुत्र होते. अजित पवार यांचा विवाह राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्याशी झाला. अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. अजित पवार यांनी त्यांचे दहावीपर्यंचे शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले होते. त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत पूर्ण केले. त्यांच्याकडे बी. कॉम. ही पदवी होती.

सहकारी कारखान्यातून कारकिर्दीला सुरुवात

अजित पवारांनी १९८२ मध्ये सहकारी कारखान्यातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार म्हणून निवडून आले, परंतु काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. १९९१ पासून ते सलग बारामती विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी जलसंपदा, अर्थ, नियोजन आणि ऊर्जा यांसारखी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली. राजकारणात अजित पवारांचा खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेते असा राजकीय प्रवास राहिला होता.

हे देखील वाचा : Ajit Pawar Death : अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? बारामतीत प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना

संसदमार्गे राजकीय एन्ट्री

१९६७ साली शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले, पुढे राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले आणि १९७८ ला मुख्यमंत्रीही झाले. मात्र, तरीही पवार कुटुंबातून शरद पवारांच्या पिढीचा किंवा पुढच्या पिढीचाही कुणी राजकारणात आलं नव्हतं. शरद पवारांनंतर पवार कुटुंबातील कुणी व्यक्ती राजकारणात आली असेल तर ती व्यक्ती म्हणजे अजित पवार होय. पवार कुटुंबाच्या होमग्राऊंडवरून म्हणजे बारामतीतून १९९१ साली अजित पवार थेट लोकसभेत निवडून गेले. याच लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघात कधीकाळी अजित पवारांचे वडील अनंतराव पवारांनी शरद पवारांचा प्रचार केला होता. यानंतर अजित पवार तिथूनच पहिल्यांदा खासदार झाले आणि आपल्या राजकारणाचा श्री गणेशा केला.

अजित पवारांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचे टप्पे

  • इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अजित पवारांनी कामगिरी बजावली. १९९१ साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली. अजित पवार १९९१ साली बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. या काळात ते कृषी, फलोत्पादन आणि उर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९१ ते १९९५ या काळात ते विधानसभा सदस्य होते.
  • अजित पवार नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या काळात जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९१ सालपासून अजित पवार विधानसभा सदस्य आहेत. १९९९ ते २००४ या काळात ते पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे आणि फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते.
  • १९९५ पासून २०१९ पर्यंत सलग सात वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ०१ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त मतांनी अजित पवार निवडून आले. २०१० पर्यंत ते जलसंपदा खात्याचे मंत्री होते. अजित पवारांवर २०१४ साली सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते.
  • २०१९ साली अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलली शपथ अनेकांसाठी धक्का होता. अजित पवारांनी आतापर्यंत शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांमध्ये आपली भूमिका पार पाडली आहे. मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते अशी पदं अजित पवारांनी भूषवली होती.

ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला –...

0
मुंबई | Mumbai राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारामती विमानतळावर आज (बुधवारी)सकाळी घडलेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासह या भीषण...