Tuesday, September 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : "मला पंखच नाही तर..."; उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM...

Devendra Fadnavis : “मला पंखच नाही तर…”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला CM फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे पंख छाटण्याचे काम सुरू आहे. परवा जेव्हा ते मला विमानात (Plane) भेटले, तेव्हा ते अत्यंत हतबल दिसत होते. आपलेच ‘बॉस’ आपले पंख कापतायत, हे त्यांनाही समजत होते, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. परभणी दौऱ्यावर असताना खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

- Advertisement -

नितीन गडकरींचे उदाहरण देत लगावला टोला

उद्धव ठाकरेंनी “नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे सुद्धा भाजपचे (BJP) अध्यक्ष होते, पण नंतर काय झाले? त्यांच्याही पंखांवर पाणी टाकून ते छाटण्यात आले. आज गडकरी कुठे आहेत? असे म्हणत फडणवीसांना टोला लगावला होता. त्यावर आता त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मला पंखच नाहीत, तर छाटणार कोण? – फडणवीस

उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल आणि तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. “मला कुठले पंखच नाहीत, तर माझे पंख कोण छाटणार? माझ्यासोबत महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा आणि माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे,” असे फडणवीस म्हणाले.

आपण ‘वेड्यांच्या बाजारात’ बसलोय काय?

उद्धव ठाकरेंनी परभणी येथील सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस मला परवा विमानात भेटले. त्यावेळी मुख्यमंत्री (CM) हतबल दिसत होते. एवढा हतबल मुख्यमंत्री मी त्यादिवशी पाहिला, असे म्हटले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “सर्व्हिस फ्लाईटमध्ये जर आम्ही योगायोगाने एकत्र आलो, तर त्यावर एवढी चर्चा का व्हावी? हे पाहून आपण ‘वेड्यांच्या बाजारात’ बसलोय की काय, असे वाटते. माझ्यासाठी राजकीय प्रश्न गौण असून, सर्व प्रश्न विकासाच्या माध्यमातून सुटणार आहेत.

…तर गप्पा मारल्या असत्या

तसेच विमानात उद्धव ठाकरे एका बाजूला आणि मी दुसऱ्या बाजूला होतो. जर आम्ही शेजारी-शेजारी बसलो असतो, तर गप्पा मारल्या असत्या. पण माझी एक सवय आहे की, मी विमानात बसल्यावर मोबाईलवर डाऊनलोड केलेली वेबसिरीज पाहण्यात व्यस्त होतो, अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...