Friday, September 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde : खासदार संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ, DCM शिंदेंकडून विषयाला...

Eknath Shinde : खासदार संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ, DCM शिंदेंकडून विषयाला बगल देण्याचा प्रयत्न; म्हणाले, “त्यांच्याविरोधात…”

मुंबई | Mumbai

ठाकरे गटातून बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांना आज (गुरुवारी) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारताच त्यांनी पत्रकारांना जाहीरपणे शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि माध्यम क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण वादावर शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया देत खासदारांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

ते म्हणाले की, “या संपूर्ण प्रकरणाची मी स्वतः सविस्तर माहिती घेणार आहे. संजय दिना पाटील यांनी माझ्याशी थेट (Meet) संवाद साधून नेमकी काय परिस्थिती होती, याची कल्पना दिली आहे. पत्रकारांच्या (Journalists) किंवा माध्यमांच्या भावना दुखावण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. काही लोकांकडून (संजय राऊत) दररोज संजय पाटील यांच्या विरोधात सतत खालच्या पातळीवर जाऊन टीका-टिप्पणी सुरू आहे. अत्यंत नीच शब्द वापरले जात आहेत, हा खरं तर लोकशाहीचा अपमान आहे. याच गोष्टीचा तीव्र राग आणि प्रचंड संताप संजय पाटील यांच्या मनात होता. त्यातूनच त्यांची ही भावना व्यक्त झाली”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

खासदार संजय दिना पाटील काय म्हणाले होते?

तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा, अशी भाषा संजय दिना पाटील यांनी वापरली.

मुख्य मुद्द्याला बगल?

एकनाथ शिंदे यांनी खासदारांच्या (MP) संतप्त भावनांमागील कारण सांगताना थेट विरोधकांवर निशाणा साधला. मात्र, खासदारांनी पत्रकारांना दिलेल्या गंभीर धमकीच्या आणि शिवीगाळीच्या मुख्य मुद्द्याला उपमुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे बगल दिल्याचेच या संवादातून दिसून आले. लोकप्रतिनिधींच्या अशा वर्तणुकीमुळे आता पत्रकार संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, खासदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गणेश विसर्जन मिरवणुकीत एकाचा मृत्यू; भिंगारमध्ये तणाव

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भिंगार मधील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शुक्लेश्वर तरूण मंडळाचे कार्यकर्ते दीपक रामकिसन वाघस्कर (वय 50, रा. वाघस्कर मळा, भिंगार) यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला...