Tuesday, September 29, 2026
Homeमुख्य बातम्याSadabhau Khot : आमदार सदाभाऊ खोतांचे जंतरमंतरवरील आंदोलकांबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले, "या...

Sadabhau Khot : आमदार सदाभाऊ खोतांचे जंतरमंतरवरील आंदोलकांबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले, “या आतंकवाद्यांना…”

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचेही सरकारला आवाहन

मुंबई | Mumbai

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवरून माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी आंदोलकांची (Protest) तुलना थेट ‘आतंकवाद्यां’शी करत, सरकारने या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सडेतोड उत्तर द्यावे, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आणि आंदोलकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

- Advertisement -

ते म्हणाले की, ” आंदोलनात मोठे षड्यंत्र असून, सरकारने दोषींना पकडत चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींना सोडले जाणार नाही. जे विद्यार्थी ‘नीट’ (NEET) परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, ते प्रवेशासाठी धावपळ करत आहेत. मात्र, ज्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही, ते केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांचा थेट संबंध नाही, त्यामुळे सरकारने त्यांचा राजीनामा मुळीच घेऊ नये”, असे खोत यांनी म्हटले.

तसेच “इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी (India Aaghadi and Mahavikas Aaghadi) केंद्र व राज्य सरकारविरोधात सातत्याने खोटे बोलून अपप्रचार करत आहेत आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या आघाड्या आंदोलनाशी संबंध नसल्याचा दावा करत असल्या, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक ग्रूप चालवणारा ट्रोल आणि ‘आय लव्ह जयंत पाटील’ हे पेज या आंदोलनात तेल ओतण्याचे आणि वातावरण बिघडवण्याचे काम करत असल्याचा आरोपही खोत यांनी केला.

दरम्यान, विरोधक आणि आंदोलक हे देशात आतंकवादासारखी (Terrorist) परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत, त्यामुळे या ‘आतंकवाद्यांना’ सरकारने लोकशाहीच्या मार्गाने चोख उत्तर दिले पाहिजे, असेही खोत म्हणाले. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...