Sunday, August 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : एकनाथ शिंदे खासदारांसह मोदींना भेटले अन् पंतप्रधानांचे 'ते' वाक्य...

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे खासदारांसह मोदींना भेटले अन् पंतप्रधानांचे ‘ते’ वाक्य उद्धव ठाकरेंना खटकले; म्हणाले “सुप्रीम कोर्टाला…”

मुंबई | Mumbai

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (शनिवार) मुंबईत पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीवरून जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या फुटीर खासदारांनी एकनाथ शिंदेंसह काल (शुक्रवारी) दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान मोदींनी खासदारांना ‘भिऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’असा धीर दिला. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, काल पंतप्रधानांना (PM) गद्दार खासदार जाऊन भेटले. त्यावेळी मोदींनी स्वामी समर्थांचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वापरले. संकटाच्या काळात हे वाक्य वापरले जाते. आता मोदी नवे स्वामी झाले आहेत का? कारण मोदी गद्दारांना भिऊ नकोस मी तुमच्या पाठीशी आहे, असं सांगत आहेत. सुप्रीम कोर्टात पक्षफुटीची सुनावणी सुरू असताना मोदींनी फुटीर खासदारांसाठी वापरलेले हे वाक्य नेमके कुणासाठी आहे? हा कोर्टाला धमकीवजा इशारा आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

तसेच गद्दार आता वॉशिंग मशीनमध्ये गेले असून , त्यांच्यावरचे डाग धुतले गेले आहेत. मात्र गद्दारीचे डाग अजून धुतले जात नाही आहेत, हे डाग धुता येणारे वॉशिंग मशीन अजून भाजपकडे (BJP) आलेले नाही.जंतरमंतरवर आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांवर काठ्या-गोळ्या चालवल्या जातात, त्यांना भेटायला पंतप्रधानांकडे वेळ नाही. मात्र, फुटीर खासदारांना भेटायला त्यांच्याकडे वेळ आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

तर पक्ष आणि चिन्हाबाबत (Party and Symbol) बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आम्ही गेल्या चार वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. संविधानाला धरूनच निकाल लागेल, अशी आम्हाला आशा आहे.” तसेच पंतप्रधानांनी दिलेला हा संदेश आणि त्यांची भीती सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संघावरही निशाणा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी तरुणांशी संवाद साधण्यापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागायला हवा होता, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी संघावर निशाणा साधला. तसेच गद्दारीचा व्हायरस लोकशाहीचा जीव घेत असून, देशातील संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी एकत्र येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

ताज्या बातम्या

Nashik News : सुट्टीमुळे सप्तशृंगी गड घाटात वाहतूक कोंडी; भाविक संतप्त

0
सप्तशृंगीगड | वार्ताहर | स्वातंत्र्यदिनाच्या लांब सुट्टीमुळे श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad Ghat) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे गडाकडे जाणाऱ्या घाट...