Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजThackeray Brothers Alliance : आधी राज ठाकरेंच्या मातोश्रींकडून औक्षण, नंतर बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन,...

Thackeray Brothers Alliance : आधी राज ठाकरेंच्या मातोश्रींकडून औक्षण, नंतर बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन, अन् मग युतीची घोषणा; पत्रकार परिषदेपूर्वी नेमकं काय-काय घडलं?

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) बहुचर्चित युतीची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सहकुटुंब हजेरी लावली. त्याठिकाणी राज ठाकरेंच्या मातोश्रींनी दोन्ही बंधूंचे औक्षण केले.यावेळी उद्धव आणि राज यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Thackeray Brothers Alliance : मनसे-शिवसेना युतीची राज ठाकरेंकडून घोषणा; दोन्ही बंधू नेमकं काय म्हणाले?

YouTube video player

दोन्ही बंधूंचे ‘शिवतीर्थ’ येथे औक्षण झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Raj Thackeray and Uddhav Thackeray) यांनी सहकुटुंब शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर युतीच्या अधिकृत घोषणेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र एकाच गाडीतून प्रवास करत पत्रकार परिषदेसाठी ब्ल्यू सी हॉटेल गाठलं. तर दुसऱ्या गाडीतून रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे स्मृतिस्थळाहून पत्रकार परिषदेसाठी दाखल झाल्या. यानंतर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. यावेळी राज ठाकरे यांनी युतीची घोषणा करताच शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

हे देखील वाचा : Thackeray Brothers Alliance : भाऊबंदकीला स्वल्पविराम; ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा

दरम्यान दोन्ही बंधूंचा मुंबई महानगरपालिकेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार शिवसेना ठाकरे पक्ष १४५ ते १५० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे समजते. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६५ ते ७० जागा आणि इतर मित्रपक्ष १० ते १२ जागांवर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दादर, माहीम आणि शिवडी यांसारख्या मराठीबहुल मतदारसंघांतील पेच सोडवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी समजूतदारपणाची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : Video : ठाकरे बंधूंकडून बाळासाहेबांना अभिवादन; राज आणि उद्धव ठाकरे कुटुंबीय स्मृतिस्थळावर उपस्थित

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : नात्यागोत्यांचा भरला मेळा! मनपाची निवडणूक ठरतेय...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिकेच्या प्रचार निवडणुकीचा (Nashik Municipal Election) दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत असून, यंदाची निवडणूक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यंदाच्या...