Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Political : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

Maharashtra Political : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

विधानसभा निवडणुकीतील (Vidhansabha Election) दारुण पराभवानंतर पक्ष बांधणीसाठी कंबर कसलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची आज त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर त्यांची पवारांसोबतची ही पहिलीच भेट आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत दारुण अपयश आल्यापासून आघाडीचे नेते एकमेकांना भेटले नव्हते. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी एकत्र बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल आत्मपरीक्षण सुद्धा केले नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना भेटून राजकीय विषयावर चर्चा केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पवार-ठाकरे भेटीत महाविकास आघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.

मी शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे हेही पवारांना भेटायला आले होते. आजच्या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आमची काँग्रेस नेत्यांसोबतही चर्चा झालेली नाही. स्थानिक निवडणुकांबाबत काँग्रेस नेत्यांची काय भूमिका आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आमची आघाडी होती. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आघाडीबाबत काँग्रेसशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

दरम्यान, पवार-ठाकरे भेटीवेळी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक यांच्यासह आदित्य ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) आदी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या