Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : अभिजीत दीपके, सोनम वांगचुंक यांच्या आंदोलनाला पाठिंबा - उद्धव...

Uddhav Thackeray : अभिजीत दीपके, सोनम वांगचुंक यांच्या आंदोलनाला पाठिंबा – उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

‘नीट’ (NEET) पेपर घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या २० जूनपासून ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि सामाजिक कार्यकर्ते अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत लडाखच्या हक्कांसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज (सोमवारी) १४ वा दिवस असून, वांगचूक यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यामुळे त्यांचे शरीर पूर्णपणे कोसळले आहे. या गंभीर परिस्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करत वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी आज (सोमवारी) मुंबईत ‘मातोश्री’ येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, “दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट’ (NEET) पेपर घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरु आहे. मात्र, या आंदोलनाकडे सरकार ढुंकूनही पाहत नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात कमीपणा काय आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत तिकडे सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) व सोनम वांगचुंक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत” असे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “चार दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांना भेटण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी मी प्राणांतिक उपोषण करू नका असे त्यांना फोनवरून सांगितले होते. वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. राहुल गांधी यांनी देखील आंदोलनस्थळी भेट द्यावी. या आंदोलनाबाबत आमचे खासदार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवतील. पंरतु, सर्वपक्षीय खासदारांनी यासंदर्भात आवाज उठवला पाहिजे,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “अभिजित दीपके हे देशातील युवकांचा आवाज उठवत आहेत. हे सर्व शिकलेले आणि सुशिक्षित युवक आहेत. आगामी २० तारखेला त्यांनी एका मोठ्या मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र, या आंदोलनात काही गुंड सोडून ते चिरडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा दावा दीपके यांनी केला आहे. सरकारचा किंवा प्रशासनाचा हा संभाव्य प्रयत्न अत्यंत हिणकस आणि नीच प्रवृत्तीचा आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

राजकीय पक्षांनी झेंडे बाजूला ठेवून एकत्र यावे

उद्धव ठाकरे म्हणाले, “सोनम वांगचुक यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे. आता अशी वेळ आली आहे की, सर्वांनीच प्रत्येक विषयावर बोलण्याची गरज नाही, पण काही राष्ट्रीय मुद्द्यांवर देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. मी पक्षाचे झेंडे घेऊन जाण्यास सांगत नाही, तर एका भावनेने एकत्र येण्याचे आवाहन करत आहे. देश जागा झाल्याशिवाय हे बेफिकिर सरकार कोणतीही हालचाल करणार नाही. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या राज्यात या आंदोलनांच्या समर्थनार्थ काहीतरी भूमिका घेतली पाहिजे” असेही त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...