Monday, September 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा मोठा निर्णय;...

Maharashtra Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा मोठा निर्णय; मुंबईतील बैठकीत एकमत

मुंबई | Mumbai

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने (Congress) मनसेसोबत युती न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या बैठकीत काँग्रेसने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या बैठकीत ‘इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांसोबतच युती केली जाईल, यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना सोबत घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

पंरतु, मनसेसोबत (MNS) युतीची शक्यता पूर्णपणे फेटाळण्यात आली आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युतीची तयारी दर्शवली आहे. मात्र केवळ इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांसोबतच युती केली जाणार असल्याचे कॉंग्रेसचे

तर इंडिया आघाडीसोबत (India Aaghadi) नसलेले पक्ष म्हणजेच मनसेसोबत युती न करण्याच्या निर्णयावर काँग्रेस नेत्यांचे एकमत झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, काँग्रेसकडून लवकरच या निर्णयाची माहिती दिल्ली हायकमांडला दिली जाणार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काँग्रेसने मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्या

गणेश

Ganesh Chaturthi 2026 : पंतप्रधान मोदींच्या देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा; देशाच्या...

0
नवी दिल्ली | New Delhiआज देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे. घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...