Monday, May 4, 2026
HomeUncategorizedRajya Sabha Election 2026 : महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार ठरला! काँग्रेसचा 'या'...

Rajya Sabha Election 2026 : महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार ठरला! काँग्रेसचा ‘या’ नेत्याला पाठिंबा

मुंबई | Mumbai

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajyasabah Election) उद्या (दि.०५) रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार असून, त्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील (Mahayuti) भाजपकडून चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली असून, ते सायंकाळपर्यंत उमेदवार घोषित करू शकतात.

- Advertisement -

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना राज्यसभेच्या जागेसाठी आग्रही होती. तसेच काँग्रेसने (Congress) देखील या जागेवर दावा सांगितला होता. त्यामुळे मविआत पेच निर्माण झाला होता. अखेर या जागेचा तिढा सुटला असून, काँग्रेस हायकमांडने राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) पाठिंबा देण्याच्या सूचना राज्यातील नेत्यांना केल्या आहेत.

या संदर्भातील माहिती काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. ते म्हणाले की, दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन आला होता. त्यांनी राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पाठिंबा देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्यसभा निवडणुकीसाठी आमचा पाठिंबा शरद पवारांना असेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Rajya sabha Election 2026 : भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेचे उमेदवार जाहीर; तावडे, आठवलेंसह ‘या’ दोन नवीन चेहऱ्यांना संधी

दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेसने जरी राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा दिला असला तरी ठाकरेंच्या शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. काल (मंगळवारी) रात्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मातोश्रीवरून जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली होती. यावेळी राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे आता काँग्रेसने शरद पवारांना पाठिंबा दिल्यानंतर ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेते हे बघणे महत्वाचे असणार आहे.

राऊतांनी केली सोशल मीडियावर पोस्ट

ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये, काँग्रेसने महाराष्ट्रातील राज्यसभेबाबत अखेर निर्णय घेतला आहे! महाविकास आघाडी एक आहे एकत्र राहील! जय महाराष्ट्र! असे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : Rajya Sabha Candidate List : भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेले रामराव वडकुते आणि माया ईवनाते कोण आहेत?

भाजपकडून उमेदवारांची घोषणा

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी भाजपने आपल्या चार उमेदवारांची घोषणा आज (बुधवारी) केली आहे. यामध्ये माजी मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) रामराव वडकुते आणि माया ईवनाते यांचा समावेश आहे. उद्या (दि.०५) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, त्याआधी भाजपने आपले उमेदवार घोषित केले आहेत.

हे देखील वाचा : Rajya sabha Election 2026 : रामदास आठवले यांचा पत्ता कट होणार? राज्यसभेसाठी भाजपकडून नवीन चेहऱ्याला संधी मिळणार!

ताज्या बातम्या

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

0
बारामती | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू...