Tuesday, May 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRajya sabha Election 2026 : रामदास आठवले यांचा पत्ता कट होणार? राज्यसभेसाठी...

Rajya sabha Election 2026 : रामदास आठवले यांचा पत्ता कट होणार? राज्यसभेसाठी भाजपकडून नवीन चेहऱ्याला संधी मिळणार!

मुंबई | Mumbai

दहा राज्यांतील ३७ राज्यसभेच्या जागांसाठी (Rajyasabha Election) निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या आहेत. त्यानुसार १६ मार्चला राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश असून, भाजपच्या (BJP) वाट्याला चार तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली आहे. तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाऊ शकतो. उद्या (दि.०५) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, राज्यातील महायुती किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भाजपच्या कोट्यातील चार पैकी एका जागेसाठी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे आग्रही आहेत. मात्र, त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काल रात्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यसभेसाठी एक जागा मिळावी अशी इच्छा व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे रामदास आठवले शेवटच्या क्षणापर्यंत राज्यसभा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आठवले यांनी राज्यसभेसाठी आपण सहज निवडून येऊ, पण आपल्याला पुढील लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवायची आहे अशी इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. तेव्हापासूनच त्यांचे पुनर्वसन करुन मित्रपक्षाच्या एका जागेवर भाजपच्या नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार विदर्भातील एका महिला उमेदवाराचे नाव दिल्लीतील भाजप नेतृत्वाकडे पाठविण्यात आल्याचे समजते.

भाजप नेत्यांनी आधीच दिली होती कल्पना

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिल्लीत काल (मंगळवारी) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांना नबीन यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी पत्ता कट होणार असल्याची कल्पना दिली होती. राज्य मंत्रिमंडळात आठवले यांना पुनर्वसन करण्याचे भाजप पक्ष श्रेष्ठींनी आश्वासन दिल्याचे बोलले जाते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आठवलेंची दोन वेळा राज्यसभेवर वर्णी लागली असून, त्यांच्याकडे समाज कल्याण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्रीपद होते.

राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

राज्यसभेसाठी भाजपने काल (मंगळवारी) महाराष्ट्र वगळता विविध राज्यांतील नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात बिहारमधून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा, छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा, आसाममधून जोगेन मोहन आणि तेरस गोवाला, ओडिशामधून मनमोहन समल आणि सुजीतकुमार, तर हरियाणातून माजी खासदार संजय भाटिया यांना भाजपने मैदानात उतरवले आहे.तसेच बिहारमधून भाजपचे सरचिटणीस शिवेशकुमार यांनाही संधी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला 1500 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याची (Onion) 5966 गोण्यांची आवक...