Sunday, April 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंनी कंबर कसली; केली 'स्पेशल' टीमची...

Maharashtra Politics : मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंनी कंबर कसली; केली ‘स्पेशल’ टीमची घोषणा

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

मुंबई महापालिकेच्या (Mumbai NMC) आगामी निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (Shivsena) मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शिंदे गटाने बुधवारी पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर केली.

- Advertisement -

महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत.
या वर्षाच्या अखेरीस मुंबई महापालिकेची निवडणूक अपेक्षित आहे. मुंबईची निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार असल्याचे महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांनी याआधीच जाहीर केले आहे.

दरम्यान, त्यामुळे महायुतीत मुंबईतील जागावाटप हा कळीचा मुद्दा असणार आहे. यामुळे जागावाटपासह अन्य महत्वाच्या विषयांवर समितीकडून निर्णय घेतले जातील. कार्यकारी समितीत (Chief Executive Committee) एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, महिला आघाडीच्या नेत्या मीना कांबळी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे, संजय निरुपम, आमदार प्रकाश सुर्वे, अशोक पाटील, दिलीप लांडे, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर, मनीषा कायंदे, माजी आमदार सदा सरवणकर, यामिनी जाधव, दीपक सावंत आणि शिशिर शिंदे यांचा या समितीत समावेश आहे

ताज्या बातम्या

सर्जेराव, ज्या ताटात जेवलात त्याच…!; काँग्रेसचा आ. सत्यजित तांबेंना टोला

0
मुंबई | Mumbai महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण पुन्हा तापले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर काँग्रेसवर टीका केली होती....