Friday, May 3, 2024
Homeनगर‘अजून एक उपमुख्यमंत्री केला तर बरं होईल, 3 शिफ्टमध्ये काम करता येईल’

‘अजून एक उपमुख्यमंत्री केला तर बरं होईल, 3 शिफ्टमध्ये काम करता येईल’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर रविवारी दिवसभर सोशल मीडियावर मिम्सचा महापूर येत, वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेताच ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडिया माध्यमांवर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या. या मिम्सच्या माध्यमातून अनेकांनी सध्याच्या राजकीय घडमोडीवर भाष्य करत सध्या राजकीय स्थितीवर टीका केली. सोशल मीडियावर उमटलेल्या या मिम्स आणि प्रतिक्रियाच्या माध्यमातून अनेकांनी आपला संतापही व्यक्त केला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी मोठा भूकंप होत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देत थेट सत्तेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी अनेक राजभवनात हजर होते. अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि इतर 9 आमदारही मंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या राजकीय बंडखोरीमुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. अनेक विरोधकांनी अजित पवारांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान या राजकीय भूकंपानंतर आता सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडत आहे. या मिम्सच्या माध्यमातून अनेकांनी सध्या राजकीय घडामोडीवर सुचक भाष्य करत, राज्यातील राजकारणावर ताशेरे ओढले आहेत.

यातील निवडक मिम्स अशा ‘पवार काकांनी भाकरी फिरवली, पुतण्या अजितदादांनी पिठाचा डबाच गायब केला’. या पुढे निवडणूक आयोगाला विनंती की, ‘मतदानाच्या वेळी बोटाला शाई ऐवजी चुना लावावा’, ‘राष्ट्रवादीच्या 40 आमदारांची तक्रार आणि नाराजी, आम्हाला थेट राजभवनात नेली, डोंगर, झाडी, हाटील आणि गुलाटी नाही दाखवली, ‘गंगाधरही शक्तीमान है’, ‘गुगलीवाले काका इंथेच राहतात ?’, काही महिन्यांनतरी हेडलाईन रिक्षा ‘धरणात’ पल्टी, शिंदे गट (मिंधे), तु कब आये, दादा (अजित पवार) सबसे पहिले मै आया था!’, एका फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी… त्या खाली फोटो ओळी आता हे दोघेच उरले आहेत…हे दोघे एकत्र आले की आपण मतदार डोळे मिटायला मोकळे !, आम्ही गदर-2 ची वाटप पाहत होतो..इंकडे गद्दार दोन रिलीत झाला…, ‘जलसिंचन घोटाळा आता इतिहास जमा झाला‘, ‘आता सगळे ईडीमुक्त झाले’, किरटी सोम्म्यांचा फोटा आणि त्याखाली ‘आता सगळ्या पुराव्यांची होडीकरून सोडून देतो’, माजी राज्यपाल कोशियारी ‘आता माझे नाव घ्याल, तर डोक्यात दगड घालीन’, अण्णा हजारे यांचा फोटा… त्याखाली ‘आता कोणा विरोधात उपोषण करू’, ‘सासूपायी वाटणी झाली अन् सासूच वाटणीला आली‘… शिंदे गटाचे आमदार सध्या डिप इन शॉक, ‘अजून एक उपमुख्यमंत्री केला तर बर होईल, 3 शिफ्टमध्ये काम करता येईल… एक एमआयसीडी कार्यकर्ता’, ‘भाजप भक्त आणि राष्ट्रवादाची अभ्यासू कार्यकर्ते मिळून हिंदूत्वाची आयटी सेल चालविणार… तरी ही वंचित आघाडी बी टिमच’, एकवेळ अविवाहीत राहिन, पण राष्ट्रवादीसोबत विवाह नाही..नाही.. नाही.. देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ व्हायरल, आता सध्या कार्यकर्ते टेन्शनमध्ये… ज्यांचे भोंगे बांधले तेच गेले दुसर्‍या पक्षात.. इंदोरीकर यांचा जुना व्हिडीओ व्हायरल, राज्यातील पुतण्यांना काय झाले. बाळासाहेब ठाकरे तुम्हाला त्रास झाला, आता मला त्रास होत असून शरद पवार तुमच्यावरही लवकरच ही वेळ येणार.. दिवंगत भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांचा जुना व्हिडीओ व्हायरल, या मिम्सचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या