Friday, April 24, 2026
HomeराजकीयMaharashtra Politics : मोठी बातमी! राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पुन्हा 'मातोश्री'वर;...

Maharashtra Politics : मोठी बातमी! राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पुन्हा ‘मातोश्री’वर; दोघांत अर्धा तास चर्चा, पडद्यामागे हालचाली जोरात?

मुंबई | Mumbai

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेतली आहे. आज (रविवारी) सकाळीच दोन्ही ठाकरे बंधू खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला एकत्र आले होते. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे हे थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी थेट मातोश्रीवर पोहोचले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ‘मातोश्री’ या निवासस्थानी दोन्ही बंधूंमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त (Happy Birthday) राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. त्यानंतर आज दुसऱ्यांदा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली आहे.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local Body Election) शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहेत. तसेच दोन्ही बंधूंकडून युतीचे संकेत देखील देण्यात आले आहेत.

युतीच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण

मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधु एकत्र आल्यानंतर मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यंदाच्या दसरा मेळाव्यामध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या ‘एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी’ वाक्याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणूका ठाकरे बंधु एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे.

राऊतांच्या कार्यक्रमात दोन्ही बंधूंमध्ये मनसोक्त गप्पा

मुंबईतील वांद्रे येथील एमसीए क्लब येथे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या मुलाचा बारशाचा सोहळा पार पडला. या कौटुंबिक कार्यक्रमाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही उपस्थित होते. याठिकाणी या दोन्ही भावांमध्ये अत्यंत मनमोकळेपणाने गप्पा झाल्याचे दिसले. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्या

Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांना अखेर उपरती; प्रकाशकाची माफी मागितली,...

0
मुंबई । Mumbai राजकारणातील आपल्या आक्रमक शैलीसाठी आणि वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले...