Wednesday, February 4, 2026
HomeUncategorizedMaharashtra Politics : मनसे-ठाकरेंची शिवसेना युती होणार? माजी नगरसेवकांचा बैठकीत राज ठाकरेंसोबत...

Maharashtra Politics : मनसे-ठाकरेंची शिवसेना युती होणार? माजी नगरसेवकांचा बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा सूर

मुंबई | Mumbai 

गेल्या दोन महिन्यांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मनोमिलनाच्या चर्चा जोरात सुरु आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितापुढे आमच्यामधील वाद, भांडंण किरकोळ असल्याचे म्हटलं होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचं स्वागत करत युतीची तयारी दर्शवली होती.

- Advertisement -

त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलेली सकारात्मक विधाने बघता ठाकरे बंधूंकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पुढील काही महिन्यांमध्ये आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या चर्चेने जोर धरला आहे. अशातच आज मातोश्रीवर झालेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना मनसेसोबत युती करायची का? असा प्रश्न विचारल्याची माहिती समोर आली आहे.

YouTube video player

यावर माजी नगरसेवकांनी (Corporates) युती केली तर फायदाच होईल, असे मत व्यक्त केले. तसेच मुंबईत युतीला अनुकूल वातावरण असल्याचेही माजी नगरसेवकांनी म्हटले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगर पालिकेसाठी आपल्याला ज्या पक्षासोबत युती करायची आहे, त्यासंदर्भात तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय होईल, असे या बैठकीमध्ये माजी नगरसेवकांना सांगितल्याचे बोलले जात आहे.

तसेच “तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात. येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्या आहेत. माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन येथे येऊन सामान्यांचे प्रश्न सोडवावेत. येत्या काळात आपल्याला अनेक बैठका घ्यायच्या आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागू शकते. त्या अनुषंगाने लवकरच शिवसेना भवन येथे आपण निवडणूक कार्यालय उघडणार आहोत”, असे उद्धव ठाकरेंनी बैठकीत म्हटले.

दरम्यान, २०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Mumbai NMC Election) शिवसेनेचे ८४ आणि मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. यानंतर २०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे गेल्या ३ वर्षांत मुंबईतील निम्म्या नगरसेवकांनी ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरेंची सेना कमकुवत झाली आहे. दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेची (MNS) देखील मुंबईत (Mumbai) ताकद कमी झालेली आहे. त्यानंतर आता या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविल्यास ते मुंबईत आपले वर्चस्व राखण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

शरद

Sharad Pawar: “त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे?” विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांनी...

0
बारामती | Baramatiराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर वेगवेगळ दावे करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाबाबत दिवंगत अजितदादा पवार...