मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkre) यांच्या लातूर (Latur) येथील पत्रकार परिषदेतील गोंधळानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी आपल्या सहकाऱ्यांसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणानंतर राष्ट्रवादीवर राज्यभरातून टीका केली जात होती.
त्यानंतर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूरज चव्हाण यांना ट्विट करत युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा (State president) राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. यानंतर अखेर सूरज चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “सूरज चव्हाण यांनी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. राज्यकर्त्यांनी संयमाने प्रसंग हाताळले पाहिजे. कालच्या घटनेचा मी निषेध केला होता,” असे त्यांनी सांगितले.




