Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : महायुतीचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला? संभाव्य यादी समोर

Maharashtra Politics : महायुतीचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला? संभाव्य यादी समोर

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत तिढा निर्माण झाला होता.अखेर मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित होऊन त्यांनी (दि.५ डिसेंबर) रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून यानंतर सर्वांचे लक्ष पालकमंत्रिपदाकडे लागले आहे. अशातच आता पालकमंत्रिपदाची संभाव्य यादी समोर आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत रायगड व कोल्हापूर जिल्ह्यावरून रस्सीखेंच पाहायला मिळत आहे. तर मुंबई शहर व सातारा जिल्ह्यासाठी भाजप व शिवसेना आग्रही असल्याचे समजते. तर गडचिरोली आणि सध्या गाजत असलेल्या बीडचे पालकमंत्रीपद कुणाला मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर रायगडवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेंच सुरु असून मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे हे दोन्ही पालकमंत्रीपदासाठी (Post of Guardian Minister) आग्रही आहेत.

तसेच कोल्हापूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडून मंत्री हसन मुश्रीफ हे पुन्हा पालकमंत्रिपद मिळण्यासाठी आग्रही आहे. तर शिवसेनेचे मंत्री प्रकाश अबिटकार यांच्याकडून देखील मागणी होत आहे. मुंबई शहर गेल्यावेळी शिवसेनाला सोडण्यात आले होते, ते पुन्हा सोडण्यात यावे अशी मागणी होत आहे. तर आगामी महापालिका निवडणूक (Election) असल्यामुळे शिवसेना भाजप दोघेही आग्रही आहेत.

त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात सुप्त संघर्ष सुरु आहे. तसेच साताऱ्यामध्ये सर्वाधिक भाजप आमदार असल्यामुळे हे भाजपला सोडण्यात यावे अशी मागणी होत आहे. मात्र, शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई देखील पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे नेमकी कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

पालकमंत्र्यांची संभाव्य यादी

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस

ठाणे – एकनाथ शिंदे

पुणे – अजित पवार

नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे

सातारा – शिवेंद्रराजे भोसले

अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील

अमरावती – चंद्रकांत पाटील

अकोला – आकाश फुंडकर \ माणिकराव कोकाटे

धुळे – जयकुमार रावल

लातूर – गिरीश महाजन

सांगली – शंभूराज देसाई

छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट / अतुल सावे

जळगाव – गुलाबराव पाटील / संजय सावकारे

यवतमाळ – संजय राठोड

कोल्हापूर – हसन मुश्रीफ

चंद्रपूर – नरहरी झिरवाळ

धाराशीव – धनंजय मुंडे

गोंदिया – आदिती तटकरे

हिंगोली – आशिष जैस्वाल

मुंबई शहर – प्रताप सरनाईक

मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा

नांदेड – आशिष शेलार

नंदुरबार – अशोक ऊईके

रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम

नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा

पालघर – गणेश नाईक

परभणी – मेघना बोर्डीकर

सिंधुदुर्ग- नितेश राणे

रत्नागिरी – उदय सामंत

सोलापूर – जयकुमार गोरे

वर्धा – पंकज भोयर

वाशिम – दत्तात्रय भरणे

जालना – अतुल सावे

भंडारा – मकरंद पाटील

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या