मुंबई | Mumbai
राज्यात महायुतीने विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) २३४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळविला आहे. या घवघवीत यशानंतर महायुतीकडून (Mahayuti) राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. पंरतु,निवडणुकीचा निकाल लागून तब्बल आठ दिवस होऊन गेले तरीही महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. तर दुसरीकडे महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्यांच्या पक्षातील विधिमंडळ नेत्यांची निवड केली आहे. मात्र, भाजपचा गटनेता ठरलेला नाही. अशातच आता भाजपचा गटनेता ठरविण्यासाठी पक्षाकडून दोन निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला
भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने महाराष्ट्रातील (Maharashtra) पक्षाचा विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. या निरीक्षकांकडून उद्या म्हणजे मंगळवारी विधीमंडळ नेते, प्रतोद, गटनेत्याची निवड केली जाणार आहे. त्यामुळे उद्याच भाजपमधून राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? हे देखील स्पष्ट होणार आहे.
हे देखील वाचा : Shrikant Shinde : महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार का? अखेर श्रीकांत शिंदेंनी स्वत:च दिलं स्पष्टीकरण
दरम्यान, महायुतीमध्ये भाजपला (BJP) १३२, शिवसेनेला (एकनाथ शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादीला (अजित पवार) ४१ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. मात्र, एकनाथ शिंदेंकडून (Eknath Shinde) देखील मुख्यमंत्रीपदाची मागणी करण्यात आली. पंरतु, त्यांच्या या मागणीला भाजपकडून नकार देण्यात आला. यानंतर शिंदेंकडून गृहमंत्रीपदाची मागणी करण्यात आली. मात्र, ही देखील मागणी भाजपकडून नाकारण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा असून त्यामुळे महायुती सरकारच्या स्थापनेला उशीर होत असल्याचे सांगितले जात आहे.