मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यात (State) मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागात विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाने (Rain) जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईसह (Mumbai) उर्वरित महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. या काळात राज्यातील विविध भागांत तुफान पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने (Meteorological Department) मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस (Hevay Rain) कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहराच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोकण (Kokan) किनारपट्टीसह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
तसेच राज्यातील इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय संपूर्ण आठवडाभर आकाश ढगाळ राहणार आहे. तर हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या हिंदी महासागर (Hindi Mahasagar) व बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून पावसासाठी अनुकूल ढग तयार होत आहेत. यंदा ‘ला-निनो’चा प्रभाव असल्याने महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.
कोणत्या जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार?
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यासोबतच अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर या ठिकाणी गडगडाटासह तर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्या नगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत.




