मुंबई –
दरवर्षी दहावी-बारावीच्या निकालानंतर जुलै – ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते. यंदा करोना संकटामुळे पुरवणी परीक्षेबाबत काहीच
- Advertisement -
स्पष्टता नव्हती. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र राज्य मंडळाने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दहावी आणि बारावीच्या फेर परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेतल्या जाणार आहेत. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच 10वी तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी यांच्या परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणार आहेत.




