Wednesday, August 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCabinet Meeting: मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय; काय आहे?

Cabinet Meeting: मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय; काय आहे?

मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (19 मे) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रीमंडळ निर्णय खालील प्रमाणे
ॲमिटी विद्यापीठाची मुळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण (ता. पनवेल, जि. रायगड) येथील पंधरा एकर जमीन देण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

- Advertisement -

चाकू खरबूजे पर गिरे या…; पेट्रोल-डिझेल दरवाढीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिल नेत्याचे खोचक ट्विट

रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनच्या या ॲमिटी विद्यापीठांतर्गत १८ शाखांमधून विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवले जातात. याठिकाणी पाच हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून इतर अभ्यासक्रम आणि शैक्षणिक विस्तारासाठी संस्थेने जमिनीची मागणी केली आहे. त्यानुसार मौजे भाताण, ता. पनवेल, जि. रायगड येथील ( स.न. ८/०, ९/२, १०/३, १३/५, १४/०,, १६७/१, १७८/०, १८२/४) या आकारीपड जमिनीपैकी सुमारे १५ एकर जमीन विशेष बाब म्हणून देण्यास मंजुरी देण्यात आली. ही जमीन कब्जेहक्काची रक्कम भरून घेऊन वर्ग-२ या धारणाधिकाराने उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जमिनीचा वापर शैक्षणिक संकुल तसेच खेळाची मैदाने, वसतीगृहे, ग्रंथालय, प्रयोगशाळा अशा शैक्षणिक कारणासाठी केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात...

0
नाशिक, दि. १९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भाविकांना मूलभूत सोयीसुविधा...