Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यावर वीजसंकट : लोडशेडिंग टाळण्यासाठी राज्य सरकारने घेतला 'हा' निर्णय

राज्यावर वीजसंकट : लोडशेडिंग टाळण्यासाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | Mumbai

राज्यात उन्हाळ्याची तीव्रता (temperature) वाढल्याने विजेची (demand for electricity) गरज वाढली आहे. त्यातच कोळसा तुटवड्यामुळे (coal shortage in maharashtra) राज्यात वीज संकट निर्माण झाले आहे. कोळसा तुटवड्यामुळे ऐन उन्हाळ्यात राज्यात सध्या अनेक ठिकाणी लोडशेडिंग सुरू आहे.

- Advertisement -

यावर तोडगा काढण्यासाठी आज राज्यमंत्री मंडळाची विशेष बैठक झाली. राज्यात लोडशेडिंग होऊ नये आणि २४ तास वीज मिळावी यासाठी राज्य सरकारने वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने वीज खरेदी करायला मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy minister Nitin Raut) यांनी दिली आहे.

पुढील दोन महिन्यांसाठी सीजीपीएल (Coastal Gujarat Power Limited) कंपनीकडून राज्याला ७०० मेगावॅट वीज मिळू शकते. राज्य सरकारकडून पुर्वी सीजीपीएल (CGPL) कंपनीकडून ४ रुपये प्रतियुनिट दराने वीज खरेदी केली जात होती. मात्र, वीजनिर्मितीचा खर्च वाढल्याने कंपनीने दर वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता साडेपाच रुपये प्रतियुनिट दराने राज्य सरकार वीज खरेदी करणार असल्याचे उर्जामंत्र्यांनी सांगितले.

तसेच कोळशाचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध होत नसल्याने हे संकट गडद झालं आहे. कोळसा साठा उपलब्ध झाला, तर त्याची वाहतूक करण्यासाठी रेल्वे ट्रॅक उपलब्ध होत नसल्याचं म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्राकडे बोट दाखवलं आहे. कोयनेत १७ टीमसीच पाणी उपलब्ध आहे. वीज दहा ते बारा रूपयांना मिळते. पण आता बाजारात वीज मिळत नाहीय. गुजरातमध्ये आठवड्यातून एक दिवस वीज बंद केली आहे, असंही राऊतांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या