Friday, May 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र देशातील एआय नवोन्मेषाचे केंद्र बनेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातील एआय नवोन्मेषाचे केंद्र बनेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबईत २९ आणि ३० मे रोजी टेक वीक

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात एआय स्वीकारण्याची आवश्यकता आहे. मुंबई टेक वीकसारख्या उपक्रमांमुळे एआय मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील एआय नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे ‘मुंबई टेक वीक २०२६’ ची घोषणा केली. टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीम) तर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयडीएफसी बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम २९ आणि ३० मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. “इंडिया : आय इन एक्शन” या थीमअंतर्गत आयोजित मुंबई टेक वीक २०२६ मध्ये विविध क्षेत्रांतील एआयच्या प्रत्यक्ष वापराचे सादरीकरण होणार असून मेटा, एंथ्रॉपिक, ओपेनाई, गूगल क्लाउड आणि नेसा यांसारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. यावेळी मुंबई टेक वीक लोगोचे अनावरण करण्यात आले.

शासन एआय चा विविध विभागांमध्ये वापर करत आहे. एआयच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होत आहे. शासन या परिवर्तनात सर्वात मोठा भागधारक म्हणून सक्रिय भूमिका बजावत आहे.”मुंबई टेक वीकसारख्या व्यासपीठांमुळे एआय संदर्भातील अनुभव लोकांपर्यंत अधिक व्यापक पातळीवर पोहोचतील, असे स्पष्ट करत फडणवीस यांनी या कार्यक्रमात शासनाच्या एआय उपक्रमांचे अनुभवात्मक सादरीकरण करण्याची सूचनाही केली.

अधिकाधिक तरुण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक या उपक्रमाशी जोडले जात आहेत, ही सकारात्मक बाब आहे. महाराष्ट्र शासन एआय क्षेत्रातील नवोन्मेष आणि उद्योगवृद्धीसाठी सदैव तुमच्या पाठीशी उभे आहे. गेल्या वर्षापेक्षा अधिक भव्य आणि प्रभावी मुंबई टेक वीक आयोजित करूया आणि महाराष्ट्रातील युवकांना एआय क्षेत्रातील नव्या संधींशी जोडूया, असेही फडणवीस म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे, टीम गव्हर्निंग कौन्सिलचे सह-अध्यक्ष संस्थापक आक्रित वैश, टीम गव्हर्निंग कौन्सिलचे सह-अध्यक्ष हर्ष जैन,संस्थापक प्रमुख, विपणन (मार्केटिंग), गव्हर्निंग कौन्सिल नैव्या साग्गी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलगी जखमी

0
पेठ | प्रतिनिधी Peth तालुक्यातील मोहाचापाडा येथे शेतातील जनावरांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करत ठार केले व घराच्या ओट्यावर झोपलेल्या व पाहुणी म्हणून मामाकडे आलेल्या...