Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार- आदित्य ठाकरे

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार- आदित्य ठाकरे

निफाड । प्रतिनिधी Niphad

50 कोटी होर्डिंग्जवर खर्च केले जातात. मात्र, शेतकर्‍यांना साधी मदत दिली नाही. पाठीवर वार करणार्‍या गद्दार सरकारला धडा शिकवा, असे आवाहन करताना आगामी निवडणुकीत शिवसेना शंभर आमदार निवडून आणेल, असा विश्वास युवासेना नेते (Yuva Sena )आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray )यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

शिवसंवाद दौर्‍यादरम्यान मंगळवारी (दि.7) चांदोरी( Chandori) येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार अनिल कदम, उपनेते सुनील बागुल, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे, आमदार नरेंद्र दराडे, गोकुळ गिते, माजी सरपंच संदीप टर्ले, नीलेश पाटील, सुधीर कराड, सुलभा पवार, दीपक शिरसाट, उत्तम गडाख उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आदित्य ठाकरे म्हणाले, ओला दुष्काळ सरकारला दिसत नाही. कृषीमंत्री शेतकरी प्रश्नांवर बोलत नाही. वीज येते पण रात्री येते. देश कृषीप्रधान असताना त्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाही. पिकविम्याचे पैसे कोणालाही मिळाले नाहीत. मंत्रिमंडळात शेतकरी प्रतिनिधी नाही. पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जातात. बदली थांबविण्यासाठी पैसे मागितले जातात. निवडणूक लावा, महाराष्ट्र तुमची जागा दाखवेल. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा सर्व्हे आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, सध्याचे सरकार मुके आहे. या सरकारच्या डोळ्यावर झापड आले आहे. बांगलादेशला द्राक्ष जातात. पण, मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट ड्युटी लावली जात आहे. शेतकर्‍यांना 50 हजार रुपये अनुदान रडतखडत दिले. जिल्हा बँकेकडून यादी देऊनही ठराविक शेतकर्‍यांनाच अनुदान दिले. नुकसान भरपाई अजून दिलेली नाही. कांद्याच्या बाबतीतही आयात-निर्यात धोरण चुकीचे राबवत आहे. येणार्‍या काळात या सरकारला धडा शिकवू, असे सांगत त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.

माजी आमदार अनिल कदम म्हणाले, केंद्र सरकारने राष्ट्रीयकृत बँकांना ओटीएस करण्यासाठी जे काही निकष सांगितले आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जदाराचे दहा लाख रुपयांचे कर्ज सेटलमेंट करून दोन लाखात कर्ज भरले जाते. मात्र, जिल्हा बँकेच्या कर्जदार सभासदांना कुठलाही दिलासा दिला जात नाही. गावच्या सोसायट्यांना व्याजात सवलत दिली जात नाही. जिल्हा बँकेचे कर्ज माफ केले पाहिजे. बांगलादेशला पाठविण्यात येणार्‍या द्राक्षावर मागीलवर्षी 30 रुपये एक्सस्पोर्ट ड्युटी होती ती यंदा 60 रुपयांपर्यंत गेली आहे. केंद्र सरकारने यात लक्ष घातले पाहिजे.

निफाड तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर असून, त्यामुळे शेतकर्‍यांना आणि असूनही पिकांना देणे शक्य होत नाही. बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे. त्याचा शेतकरी व मजुरांना त्रास होतो. मात्र, शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी आताचे सरकार पुढे येत नसल्याची खंत अनिल कदम यांनी व्यक्त केली. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मेळाव्याला मा.पं.स. सभापती राजेश पाटील, प्रकाश वाटपाडे, देवेंद्र काजळे, योगेश कुयटे, खंडू बोडके, शहाजी राजोळे, विजय गवळी, संजय कुंदे, संजय धारराव, तुषार खरात, शंकर संगमनेरे, भाऊ घुमरे, बाबाजी कुशारे आदी उपस्थित होते. सुहास सुरळीकर यांनी सूत्रसंचालन, विक्रम रंधवे यांनी आभार मानले.

शिंदे सरकार महाराष्ट्राचे की गुजरातचे?

शिंदे सरकारने महाराष्ट्रात राहून गुजरातला उद्योग दिले. दिल्लीत झुकणारे हे सरकार शेतकरी हिताचे नाही. तरुणांचा रोजगार हिरावला गेला. शंभर टक्के गुंतवणूक होणार्‍या उद्योगांना गुजरातला पाठविले ही बाब निश्चितच मराठी माणसाशी केलेली प्रतारणा आहे. या सरकारला सामान्यांशी काहीही देणेघेणे नाही. अशा सरकारला पायउतार करण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या