राहाता |वार्ताहर| Rahata
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्याचा निषेध म्हणून राहाता शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणा देऊन पोलिसांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी दोषींवर कडक कारवाई करण्यात येऊन त्यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी. राजकोट किल्ल्यावर पुन्हा महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा. राहाता नगरपालिकेकडे असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गोडावूनमध्ये डांबवून ठेवला आहे. तो मुक्त करून त्वरित बसविण्यात यावा. सदरच्या पुतळ्याच्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. फक्त राजकीय हेतूपोटी तो पुतळा डांबून ठेवण्यात आलेला आहे. महाविकास आघाडी कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवप्रेमी यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला.
यावेळी प्रभावती घोगरे, सचिन गुजर, अॅड. पंकज लोंढे, सचिन चौगुले, गणेश सोमवंशी, सोमनाथ गोरे, धनंजय गाडेकर, शशिकांत लोळगे, रणजित बोठे, उत्तमराव घोरपडे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी विजय दंडवते, भगवानराव टिळेकर, संपत हिंगे, अनिल बोठे, निलेश कार्ले, नितीन सदाफळ, उत्तमराव मते, निलेश डांगे, मच्छिंद्र गुंजाळ, प्रभाकर डांगे, संतोष वाघमारे, सदाशिव गाडेकर, साहिल मस्के, शिवप्रसाद आहेर, जाकीर शेख, संदीप कोकाटे, सोमनाथ जेजुरकर, जाईद दारुवाले, भानुदास कातोरे, सुनील परदेशी, गोकुळ ठुबे, कुणाल गोरे, मच्छिंद्र भवर, अमोल आराणे, अमोल गोर्डे, अजय त्रिभुवन, साहिल खर्डे, सागर कडू आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.