Thursday, July 2, 2026
HomeUncategorizedमहिला दिन

महिला दिन

महिला दिन

रोज लुटली जाते इथे
रस्त्यावर इज्जत महिलेची
अन आम्ही गातोय समारंभात
महिती महिला दिनाची

- Advertisement -

वर्षांनुवर्षे निर्भया माझी
न्यायासाठी लढते आहे
न्यायदेवता माझ्या देशाची
आरोपीला संधी देते आहे

येता जाता भरचौकात
होतो तिचा विनयभंग
आम्ही मात्र समारंभात
हारतुरे घेण्यात दंग

शेजारी नातेवाईक भाऊ अन बापही
अत्याचार पोरीवर करतो आहे
आजची नारी सक्षम किती
यावरच भाषण झोडतो आहे

जेंव्हा मायबहीण आपली
निर्भयपणे रस्त्यावर फिरेल
तो दिवस खऱ्या अर्थाने
महिला दिवस असेल

माधुरी चौधरी औरंगाबाद
9421860873

ताज्या बातम्या

Amol Kolhe : खासदार डॉ. अमोल कोल्हेंचे ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले,...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी काल (बुधवारी) माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)...