Sunday, April 27, 2025
Homeनाशिकमुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी अबू सालेमची पुन्हा नाशिकरोड कारागृहात रवानगी

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी अबू सालेमची पुन्हा नाशिकरोड कारागृहात रवानगी

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

मुंबईमधील साखळी बॉम्बस्फोटातील (Mumbai Serial Blasts) प्रमुख आरोपी आबू सा्लेम (Abu Salem) यास आज पुन्हा नाशिक मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी नाशिकरोड कारागृहातून रेल्वेने दिल्ली येथे नेण्यात आले होते. यावेळी नाशिकरोड कारागृह ते रेल्वे स्थानक दरम्यान मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची संततधार; गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ

मुंबईमध्ये १९९३ साली साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये अनेक निष्पाप लोक मृत्यूमुखी (Deathly) पडले होते. या घटनेने सर्व देश हदरला होता. त्यानंतर मुबंई पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी आबू सा्लेमला शोधून काढले होते. तपासात हाच या बॉम्बस्फोटचा प्रमुख आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचबरोबर मुबंईमधील सिनेसुष्टीतील मोठमोठ्या कलाकारांना, दिग्दर्शकांना धमक्या देऊन खंडणी उकळत असे, यात अनेक लोकांना त्याने जीवे ठार मारल्याने त्याच्यावर गुन्हे आहेत.

हे देखील वाचा : Video : पिंपळद-ब्राह्मणवाडे पुलावर पाणी; ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास

यातील मुंबई बॉम्बस्फोटमध्ये व इतर गुन्ह्यात न्यायालयाने अबू सा्लेम यास कठोर शिक्षा सुनावली आहे. तर काही गुन्हे हे न्याय प्रविष्ट आहेत. यापूर्वी तो तळोजा कारागृहात होता, त्यास काही दिवसापूर्वी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी दिल्ली येथे न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून दिल्ली येथे नेण्यात आले होते. दिल्ली येथील न्यायालयाचे कामकाज संपताच रेल्वेने मनमाड येथे आणण्यात आले. त्यानंतर मनमाड ते नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहपर्यंत बायरोड पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...