Tuesday, November 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकेंद्र सरकारचा मोठा निर्णय, 11.40 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 11.40 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, 11,40,770 रेल्वे कर्मचाऱ्यांना 2,009,.61 कोटी रुपयांचा 78 दिवसांचा उत्पादकता-आधारित बोनस देण्याला मंजुरी दिली आहे.

पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी दुर्गा पूजा/दसरा सुट्ट्यांपूर्वी हा बोनस दिला जातो. यावर्षीही, सुमारे 11.40 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतकी बोनसची रक्कम दिली जात आहे. हा बोनस रेल्वेची कामगिरी सुधारण्याच्या दिशेने काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करतो.

प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला 78 दिवसांसाठी मिळणारी कमाल रक्कम 17,951 रुपये इतकी आहे. ही रक्कम ट्रॅक मेंटेनर्स, लोको पायलट्स, ट्रेन मॅनेजर्स गार्ड्स, स्टेशन मास्टर्स, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ , तंत्रज्ञ मदतनीस , पॉइंट्समन, लिपिकीय कर्मचारी आणि इतर गट-सी कर्मचारी अशा विविध श्रेणींमधील रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली जाईल.

2025-26 या वर्षात रेल्वेची कामगिरी अत्यंत चांगली राहिली. रेल्वेने 1,670 दशलक्ष टन मालवाहतुकीचा विक्रम केला आणि सुमारे 7.41 अब्ज प्रवाशांची वाहतूक केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ऊसदरावर निर्णय न झाल्यास शनिवारी रेलरोको-रास्तारोको

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाला राज्यातील अन्य जिल्ह्याप्रमाणे भाव मिळावा, या मागणीसाठी 26 तारखेला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत...