Friday, October 23, 2026
Homeभविष्यवेधयाची एकदा खात्री कराच !

याची एकदा खात्री कराच !

एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल हे त्याच्यासोबत काही काळ व्यतित केल्याशिवाय कळत नाही. पण तुम्हाला माहितीये का व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज त्याच्या देहबोलीवरुन येतो. एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्यावरुनही त्याचा स्वभाव व त्यांच्या अंगी असलेले कलागुण याचा अंदाज बांधता येतो. आज आम्ही तुम्हाला याबाबतच सांगणार आहोत.

सरळ अंगठा – काही जणांचा अंगठा हा अगदी सरळ असतो त्याला थोडादेखील बाक नसतो. अशा लोकांचा स्वभाव म्हणजे ते सरळ साध्या स्वभावाचे असतात. त्यांच्यात आत्मविश्वास असतो. तसंच, इमानदार व निष्ठावान असतात.

मागच्या बाजूला झुकलेला अंगठा-
ज्या व्यक्तींचा अंगठा मागच्या बाजुला झुकलेला असतो वा अत्यंत लवचिक असतो असे लोक कोणत्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेतात. परंतु, या लोकांच्या स्वभावातील दोष म्हणजे ते हलक्या कानाचे असतात.

कठोर अंगठा- ज्या व्यक्तींचा अंगठा कठोर असतो असे लोक स्वभावानेदेखील कठोर असतात. मात्र, त्यांचे मन स्वच्छ असते तसंच, ते स्पष्टवक्ते असतात. मात्र, कधी कधी ते या स्वभावामुळं समोरच्याला नकळत दुखावतात.

मुलायम अंगठा – काही लोकांचा अंगठा खूपच मृदू असतो. अशा लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नेहमी सकारात्मक असतो. यामुळं त्यांची कायम प्रगती होत असते. तसंच, नेहमी यशस्वी ठरतात.

मोठा अंगठा – काही जणांची बोटं लांबसडक असतात अशी लोकं दिसायला आकर्षक असतात तसंच, कुशाग्र बुद्धीचे असतात. त्यांच्यात नेतृत्वाचे गुण असतात.

छोटा अंगठा – ज्या व्यक्तींचा अंगठा लहान असतो असे लोक कलाक्षेत्राशी जोडलेले असतात. त्यांच्याकडे मित्रांची कमतरता नसते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. सहकाराच्या माध्यमातून राजकीय वर्चस्व टिकविण्याची धडपड, नेत्यांमधील मतभेद आणि पडद्यामागील...