Saturday, October 3, 2026
HomeनाशिकNashik News : सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धेच्या नोंदणीला मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत...

Nashik News : सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धेच्या नोंदणीला मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी

जनजागृती करण्याचा कुंभमेळा प्राधिकरणाचा उपक्रम

नाशिक | Nashik

आगामी सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७चा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत (Citizen) पोहोचविण्यासोबतच नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील गणेश मंडळांचा (Ganesh Mandal) व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’च्या नोंदणीची मुदत वाढविली आहे. यापूर्वी १० सप्टेंबर २०२६पर्यंत असलेली नोंदणी आता १७ सप्टेंबर २०२६पर्यंत करता येणार आहे.

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या (Ganeshtosav) माध्यमातून सिंहस्थचा आध्यात्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाधारित संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अधिकाधिक गणेश मंडळांना या उपक्रमात सहभागी होता यावे आणि त्यांच्या कल्पकतेला महासिंहस्थच्या जनजागृतीशी जोडता यावे, या उद्देशाने नोंदणीसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.

नाशिक शहर तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातील (Trimbakeshwar Area) गणेश मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, मंडळांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर सिंहस्थविषयक जनजागृती, सामाजिक सहभाग आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

कल्पकतेला प्रोत्साहन, खर्चाला नाही

स्पर्धेत मोठ्या किंवा खर्चिक सजावटीपेक्षा कल्पकता, सर्जनशीलता, नागरिकांचा सहभाग आणि शाश्वतता यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे लहान-मोठ्या सर्व गणेश मंडळांना सहभागी होऊन आपली संकल्पना मांडण्याची समान संधी मिळणार आहे.सिंहस्थच्या विषयाशी सुसंगतता, कल्पकता, अंमलबजावणीची गुणवत्ता, नागरिकांचा सहभाग व उपक्रमाचा परिणाम तसेच शाश्वतता या निकषांवर मंडळांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

सहा विषयांवर आधारित उपक्रम

गणेश मंडळांना सिंहस्थशी संबंधित सहा प्रमुख विषयांभोवती देखावे किंवा विविध जनजागृती उपक्रम राबविता येणार आहेत. यामध्ये महाकुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व, नाशिक-त्र्यंबकेश्वरचा वारसा, तंत्रज्ञान आणि कुंभ, हरित व शाश्वत कुंभ, कुंभ आणि आखाडे तसेच भाविकांची सेवा आणि समर्पण या विषयांचा समावेश आहे. या माध्यमातून गणेशोत्सवाच्या सार्वजनिक व्यासपीठाचा उपयोग सिंहस्थची माहिती, त्यामागील सांस्कृतिक वारसा आणि नागरिकांची भूमिका याबाबत जनजागृती करण्यासाठी केला जाणार आहे.

१७ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची संधी

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश मंडळांना आता १७ सप्टेंबर २०२६पर्यंत नोंदणी करता येणार आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकृत Instagram हँडल ‘ntkma2027’ वर उपलब्ध Google Form द्वारे नोंदणी करता येईल. स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना, नोंदणी प्रक्रिया आणि पुढील घोषणा याच सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पाच श्रेणींमध्ये प्रत्येकी एक लाखांचे पारितोषिक

‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’त पाच प्रमुख श्रेणी असून प्रत्येक श्रेणीतील विजेत्या मंडळाला १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय नावीन्यपूर्ण आणि विशेष संकल्पनेसाठी २ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.

  • कुंभ संकल्पनेवर आधारित सर्वोत्कृष्ट देखावा – ₹१ लाख
  • सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक देखावा – ₹१ लाख
  • सर्वोत्कृष्ट पर्यावरणपूरक गणेश मंडळ – ₹१ लाख
  • सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान व नाविन्य – ₹१ लाख
  • सर्वोत्कृष्ट सामाजिक उपक्रम – ₹१ लाख

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...